C

Pune Crime  : पाणीपुरीचे पैसे मागितल्याचा राग आल्याने दोघांनी विक्रेत्यावर चाकूने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी राजेंद्र जाठम यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पाणीपुरीचे पैसे मागितल्याचा राग आल्याने दोघांनी विक्रेत्यावर चाकूने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पुण्यातील शनिवारवाड्यासमोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रोडवर ही घटना घडली आहे. अतिशय वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा सर्व प्रकार रविवारी रात्री पावणे आठच्या सुमारास घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री पावणे ८ वाजताच्या सुमारास, २ तरुण रिक्षा मधून शनिवारवाडा समोर असलेल्या शिवाजी रोड या ठिकाणी एका पाणीपुरी स्टॉलवर आले. त्यांनी पाणीपुरी विक्रेत्याला शिवीगाळ करुन "एक पाणीपुरी दे और तू अपने भाई को बुला" असे म्हणले.

यावर कुठलाही वाद न घालता विक्रेत्याने त्यांना पाणीपुरी दिली. त्यानंतर पाणीपुरीचे पैसे द्या असं विक्रेता म्हणताच" आम्हाला पैसे कसे मागतो" असे म्हणत दोघांनी खिशातील चाकू काढून विक्रेत्याच्या हाताच्या कोपऱ्यावर आणि दंडावर वार केले.या चाकू हल्ल्यात पाणीपुरी विक्रेता गंभीर जखमी झाला असून, जखमी अवस्थेत त्याने थेट पोलीस ठाणे गाठत घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानुसार फरासखाना पोलीस ठाण्यात दोन अज्ञात आरोपींविरोधात भारतीय दंडात्मक कलम ३२३,३२६, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास पोलीस करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *