
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त अनेक कार्यक्रम राबविण्यात आले आहे. विधिमंडळामध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचं अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दरम्यान, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत आज, सोमवारी विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात त्यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे अनावरण होणार आहे.दरम्यान, माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे यांनी क्षणोक्षणी मला बाळासाहेबांची आठवण येते. असं भावूक वक्तव्य केलं.
बाळासाहेब यांचे योगदान केवळ राज्यात नव्हे तर जगभरात. बाळासाबेबांमुळेच सर्वसामान्य कार्यकर्ते अनेक मोठ्या पदावर आहेत. माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्तादेखील त्यांच्याच विचारांनी प्रभावित होत, त्यांच्याचमुळे, त्यांच्या आशीर्वादामुळे आज मी या राज्याच मुख्यमंत्री आहे. मला काम करण्याची संधी मिळाली.
मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. सगळं काही योगदान त्यांचेच आहे. एकही क्षण जात नाही की त्यांची आठवण येत नाही. त्यांची जी काही शिकवण आहे. ती सर्वसामान्यांना न्याय देणारी आहे. त्यांच्या विचारांच्या आधारांवरच हे सरकार स्थापन करण्यात आलं आहे. अनेक निर्णय आम्ही जनतेच्या हिताचे घेतले आहेत.
बाळासाहेबांच्या तैलचित्र अनावरणाच्या सोहळ्यासाठी विविध मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे तसेच ठाकरे कुटुंबातील सर्व सदस्यांचा समावेश आहे.
उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबातील सर्वांना या सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्याशी मी स्वत: बोललो असून हा सोहळा अतिशय भव्यदिव्य असा होणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी रविवारी सांगितले.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




