Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर खासगी बसला भीषण अपघात; बस रस्त्याच्या मधोमध उलटली, एकाचा मृत्यू, 20 जण जखमी

बुलडाणा : नागपूरहून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा नजीकच्या असोला फाटा गावाजवळ हा अपघात झाला. अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे, तर 20 प्रवासी जमखी झाल्याची माहिती मिळत आहे.

राही ट्रॅव्हल्सची खाजगी लक्झरी बस नागपूरहून औरंगाबादला जात असताना देऊळगावजवळ बसला अपघात झाला. बस समृद्धी महामार्गावर मध्यभागी उलटली. अपघाताग्रस्त बसमधून प्रवासी बाहेर निघून महामार्गाच्या बाजूला जात होते. 

प्रवासी रस्ता ओलांडत असताना मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने दोन प्रवाशांना चिरडले. यात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला तर एक प्रवासी गंभीर जखमी आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली आहे. सध्या अपघातग्रस्त बस महामार्गाच्या बाजूला करण्याचं काम सुरू आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *