दिल्ली-पुणे विमानात बॉम्ब असल्याच्या फोनने खळबळ, बॉम्ब स्क्वॉड पथकाकडून विमानाची तपासणी

पुणे : दिल्लीहून पुण्याकडं येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचा कॉल पोलिसांना आल्यानं दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर मोठा गोंधळ निर्माण झाला. दिल्ली विमानतळावर फ्लाइटची तपासणी केली जात असल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितलं आहे.

दिल्ली पोलिसांनी म्हटलं, "दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानात बॉम्ब असल्याबाबतचा फोन टेकऑफपूर्वी आला होता. या कॉलनंतर CISF आणि दिल्ली पोलीस सतर्क झाले आहेत. दिल्ली विमानतळावर संबंधित विमानाची तपासणी केली जात आहे. आतापर्यंत काहीही संशयास्पद आढळलेलं नाही, परंतु SOP नुसार सुरक्षाविषयक हालचालीचं पालन केलं जाईल"



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *