पुणे : आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात; गंभीर दुखापत

पुणे - भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला आज पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातानंतर गाडी ५० फुट खोल दरीत कोसळली. यावेळी गाडीत आमदार गोरेंसह चौघे जण होते. जखमींना उपचारासाठी बारामतीला हलविण्यात आलं. तर गोरे यांच्यावर पुण्यात उपचार सुरू आहे. गोरे हे सातारा जिल्ह्यातील मान-खटावचे आमदार आहेत.

या अपघातात गोरे यांच्यासह चौघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात कार ५० खोल दरीत कोसळली. या अपघातात जयकुमार गोऱे थोडक्यात बचावले. मात्र त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. दोघांना बारामीत येथील रुग्णालयात हालविण्यात आलं आहे. तर जय कुमार गोरे यांना पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जयकुमार गोरे यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. पहाटे साडेतीन वाजता हा अपघात झाला आहे.

पुण्याहून गावी दहिवडीकडे जात असताना हा अपघात झाला. मात्र, काळोखामुळे कार चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

 


विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *