पुणे : कोरेगाव पार्क भागातील वस्त्रदालनात ग्राहकाचे अश्लील कृत्य; कर्मचारी युवतीकडून पोलिसांकडे तक्रार

पुणे : कोरेगाव पार्क भागातील एका वस्त्रदालनात कर्मचारी युवतीसमोर एका ग्राहकाने अश्लील कृत्य केले. वस्त्रदालनातील एका कक्षात ही घटना घडली. या प्रकरणी ग्राहकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत एका २३ वर्षीय युवतीने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार युवती कोरेगाव पार्क भागातील एका वस्त्रदालनात कर्मचारी आहे.

दुपारी तीनच्या सुमारास एक जण वस्त्रदालनात खरेदीच्या बहाण्याने आला. त्या वेळी वस्त्रदालनात युवती एकटी होती. आरोपी ग्राहकाने युवतीकडे मोबाइल क्रमांक मागितला. ग्राहकाने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. ग्राहक वस्त्रदालनातील वस्त्र बदलण्याच्या कक्षात गेला. त्या वेळी त्याने अश्लील हावभाव केले. त्यानंतर ग्राहक वस्त्रदालनातून निघून गेला. या घटनेमुळे घाबरलेल्या युवतीने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक कुलकर्णी तपास करत आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *