Samriddhi Highway : नव्या-कोऱ्या समृद्धी महामार्गावर बर्निंग कारचा थरार; धावत्या कारनं अचानक घेतला पेट,

Samruddhi Mahamarg : ११ डिसेंबरपासून सुरू करण्यात आलेल्या समृद्धी महामार्गाबाबत एका थरारक घटना समोर आली आहे. शिर्डी नागपूर या समृद्धी महामार्गावर एका धावत्या कारनं अचानक पेट घेतला आहे. या आगीत कार जळून खाक झाली आहे. औरंगाबादनजीक वैजापूरजवळील गलांडे वस्तीजवळील ही दुर्देवी घटना घडली आहे. या थरारक घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

धावत्या कारमध्ये काहीतरी जळाल्याचा वास येत असल्याने चालकाने कार हायवेच्या एका बाजूला उभी केली. इतक्यात कारने अचानक पेट घेतला. ही आग इतकी भयंकर होती की या आगीत कार‌ जळून खाक झाली आहे. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते, मात्र या आगीचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबरला समृद्धी महामार्गाचं लोकार्पण करण्यात आले होते. त्यानंतर तिसऱ्या दिवशीच वायफळ टोल नाक्यावर दोन कारमध्ये अपघात झाल्याचे समोर आले होते. या घटनेत सुदैवाने कोणीही गंभीर जखमी झालेले नसले तरी दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले होते. सोबतच एक स्विफ्ट कार आणि मर्सिडीज कारचीही धडक झाली होती. त्यामुळे समृद्धी महामार्गावरील अपघात वाढत आहे. 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *