
पुणे : अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक ‘ताम्रपट’कार रंगनाथ पठारे यांना साहित्य जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. समाजकार्य विभागात जीवनगौरव पुरस्काराऐवजी शांताराम पंदेरे आणि प्रमोद झिंजाडे यांना विशेष पुरस्कार तर, ऑस इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क या संस्थेला डाॅ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे.
अमेरिकेमध्ये स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी साहित्य आणि समाजकार्य पुरस्कार दिले जातात. मासूम संस्था आणि साधना ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने २८ जानेवारी रोजी टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती मासूमच्या सहसमन्वयक डाॅ. मनीषा गुप्ते, साधना ट्रस्टचे विनोद शिरसाठ आणि पुरस्कार निवड समितीचे मुकुंद टाकसाळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. कथा आणि कादंबरी वाङ्मय क्षेत्रातील कामगिरीबद्दल राजन गवस, अनुवाद व लेखन या क्षेत्रातील कामासाठी सोनाली नवांगुळ यांना विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे. अनिल साबळे यांच्या ‘पिवळा पिवळा पाचोळा’ या कथासंग्रहासाठी ललित ग्रंथ पुरस्कार, शरद बाविस्कर यांना ‘भुरा’ या आत्मकथनासाठी अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार तर, ‘पुनश्च हनिमून‘ नाटकाच्या लेखनासाठी संदेश कुलकर्णी यांना रा. शं. दातार नाट्यलेखन पुरस्कार जाहीर झाला आहे.
दलित आणि भूमिहीनांच्या हक्कासाठी केलेल्या कार्यासाठी औरंगाबाद येथील शांताराम पंदेरे आणि गेल्या वर्षभरात विधवा प्रथा निर्मूलनाच्या संदर्भात केलेल्या कार्यासाठी करमाळा येथील प्रमोद झिंजाडे यांना सामाजिक क्षेत्रासाठीचे विशेष कार्य पुरस्कार जाहीर करण्यात आले येणार हे दोन्ही विशेष कार्य पुरस्कार प्रत्येकी एक लाख रुपये व स्मृतिचिन्ह या स्वरूपातील आहेत. गडचिरोली येथील कुमारीबाई जमकातन यांना संघर्ष पुरस्कार आणि नंदिनी जाधव यांना प्रबोधन पुरस्कार जाहीर झाला आहे. दिल्ली येथील ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क संस्थेला डाॅ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




