
Mahaparinirvan Din 2022: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी मुंबई महापालिकेकडून खास व्यवस्था करण्यात आली आहे. आजपासून म्हणजे ५ डिसेंबरपासून ते ७ डिसेंबरपर्यंत भीम अनुयायांसाठी बेस्ट प्रशासनाकडून खास उपक्रम राबवण्यात आला आहे. यानुसार संपूर्ण मुंबईत अवघ्या 60 रुपयांत फिरता येणार आहे. साेबतच मोफत सहलीचाही लाभ घेता येणार आहे.
महापरिनिर्वाण दिनासाठी मुंबईत येणाऱ्या अनुयायांना मुंबईत फिरता यावं, यासाठी 50-60 रुपयांचा पास बेस्ट प्रशासनाने जाहीर केला आहे. आजपासून (5 डिसेंबर ते 7 डिसेंबर) पुढील 2 दिवस चलो स्मार्ट कार्ड शिवाय हा पास उपल्बध असणार आहे. शिवाजी पार्क, चैत्यभूमी या ठिकाणी हे पास मिळणार असून अधिकाधिक लोकांनी हे पासेस खरेदी करावे असं आवाहन बेस्ट प्रशासनाने केलं आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांविषयी माहिती देण्यासाठी, पर्यटन संचालनालयाद्वारे 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट' आयोजित करण्यात आली आहे. ३ डिसेंबरपासून ही सहल सुरू झाली असून ४, ७ आणि ८ डिसेंबरपर्यंत विनामूल्य सुरू राहणार आहे. सहलीसाठी दररोज ४ बसेस धावत आहेत. लोकांना फर्स्ट कम फर्स्ट आधारावर घेतले जात आहे.
या टूरमध्ये सहभागी होण्यासाठी ते ऑनलाईन किंवा ऑफलाईन नोंदणी करू शकतात. मुंबईत ऑनलाईन नोंदणीसाठी Dr. Babasaheb Ambedkar Tourism Circuit या लिंकवर क्लिक करा. तर ऑनलाईन नोंदणी करावी. तसेच ऑफलाइन नाव नोंदणीसाठी 7738375812 विक्रम किंवा रसिका 7738375814 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कशी असेल सहल?
पर्यटकांना सकाळी 9 वाजता दादर शिवाजी पार्कजवळील गणेश मंदिर येथून, चैत्यभूमी आणि त्यानंतर राजगृहाकडे नेले जाईल. त्यानंतर त्यांना बीआयटी चाळ क्र. 1 खोली क्र. 50/51 या ठिकाणी नेले जाईल. या सहलीची सांगता सिद्धार्थ कॉलेज, फोर्ट येथे होईल. दुपारी 2 च्या सुमारास दादरच्या गणेश मंदिराजवळ सहलीच्या सुरुवातीच्या ठिकाणी सोडण्यात येईल.
बाळासाहेबांची शिवसेना पक्षातर्फे बीएमसी जिमखाना शिवाजी पार्क येथे चैत्यभूमीवर येणाऱ्या सुमारे पाच लाख अनुयायांसाठी विनामूल्य जेवण देण्यात येणार आहे. आज मध्यरात्रीपासूनच हे जेवण वितरित करण्याचे काम केले जाणार आहे. विशेष म्हणजे इथे जेवण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना बसून व्यवस्थित पोटभर जेवण वाढण्यात येणार आहे.
स्थळ: शिवाजी पार्क पेट्रोल पंपाच्या बाजूला, बीएमसी जिमखाना मैदान
अधिक माहितीसाठी संपर्क : 9987373333 ( श्री. राम रेपाळे, माजी नगरसेवक, ठाणे महानगरपालिका)
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




