
वेदान्त फॉक्सकॉन प्रकल्पानंतर आता टाटा एअरबस हा प्रकल्पदेखील गुजरातमध्ये गेल्यानंतर शिंदे गट-भाजपा सरकारवर सडकून टीका केली जात आहे. राज्य सरकार राज्यात नवे प्रकल्प आणण्यात अपयशी ठरल्याचा ठपका विरोधकांकडून ठेवला जात आहे. असे असताना आता उद्धव ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत शिंदे सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. मागील चार महिन्यांमध्ये राज्यात येणारे ४ मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. गुंतवणूकदारांना विद्यमान सरकारवर विश्वास राहिलेला नाही, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
टाटा एअरबस प्रकल्पतरी महाराष्ट्रात आणावा, असे आम्ही सत्ताधाऱ्यांना सांगत होतो. एकीकडे कृषी क्षेत्राचे नुकसान होत आहे. तर दुसरीकडे उद्योग क्षेत्रातही आपल्या हातातून चार प्रकल्प गेले आहेत. पहिला प्रकल्प हा वेदान्त फॉक्सकॉनचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात सांगितले होते, की हा प्रकल्प राज्यात येईल. या प्रकल्पाविषयी ऑगस्टपर्यंत बैठका झाल्या. मात्र सप्टेंबरमध्ये हा प्रकल्प गुजरातला गेला. दुसरा प्रकल्प हा बल्क ड्रग पार्क हा आहे. आपल्याकडे ३९४ फार्मसी कॉलेज आहेत. मात्र बल्क ड्रग पार्क हा प्रकल्प चार अन्य राज्यांना देण्यात आला. सत्ताधारी मात्र हा प्रकल्प राज्यात आणू शकले नाहीत. मेडिकल डिव्हाईस पार्क हा तिसरा प्रकल्पदेखील राज्यातून गेला. हा प्रकल्प औरंगाबादेत होणार होता. चौथा प्रकल्प हा टाटा एअरबस हा आहे. हा चौथा प्रकल्पही महाराष्ट्रातून गेला आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार होते, तेव्हा आमचा केंद्र सरकारशी चांगला संवाद सुरू होता. मात्र सध्याचे घटनाबाह्य सरकार आल्यापासून सरकारचे एक इंजिन फेल झालेले आहे. याच कारणामुळे हे प्रकल्प परराज्यात गेले आहेत. कदाचित तिकडच्या राज्यांतील निवडणुकांमुळे हे झाले असावे. कोणत्याही उद्योजक तसेच गुंतवणूकदाराला या सरकारवर विश्वास राहिलेला नाही. हे थोड्या दिवसांचे सरकार आहे. या सरकारमध्ये काही आमदार नाराज असल्याचे माझ्या कानी आले आहे. दोन-तीन आमदारांमध्ये जगजाहीर भांडण सुरू आहे. महाराष्ट्र सध्या ज्या परिस्थितीतून जात आहे, ते चांगले नाहीये. एका व्यक्तीच्या गद्दारीमुळे महाराष्ट्र मागील चार महिन्यांपासून फटके खात चालला आहे.
शहर
- बारामती: पुण्यात भीषण अपघातात बोडरे कुटुंबातील तीनही भावंडांचा दुर्दैवी अंत
- पुणे: नवले ब्रिजवर भरधाव सिमेंट टँकर पलटी झाल्याने दुचाकीस्वाराचा चिरडून मृत्यू.
- मुंबईत सरकारचा मोठा दणका! १९,७३४ जन्म दाखल्यांमधील बेकायदेशीर दुरुस्त्या रद्द होणार; मूळ नोंदी पुनर्संचयित करण्याचे आदेश!
- बारामती तालुक्यात जलक्रांती! सुनेत्रा पवार यांच्या पुढाकाराने खांडज येथील बेंदचारीच्या खोलीकरण व रुंदीकरण कामाला जोरदार प्रारंभ; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण!
महाराष्ट्र
- बारामती: पुण्यात भीषण अपघातात बोडरे कुटुंबातील तीनही भावंडांचा दुर्दैवी अंत
- भंडारा: वासनांधांचा नकार देणाऱ्या अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल; आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केल्याने खळबळ
- अमरावती: 'बोगस' जन्मप्रमाणपत्रांचा मोठा स्फोट; तब्बल ४० हजार संशयास्पद नोंदी उघड!
- पुणे: नवले ब्रिजवर भरधाव सिमेंट टँकर पलटी झाल्याने दुचाकीस्वाराचा चिरडून मृत्यू.
गुन्हा
- अमरावती: 'बोगस' जन्मप्रमाणपत्रांचा मोठा स्फोट; तब्बल ४० हजार संशयास्पद नोंदी उघड!
- पुणे: आर्मीच्या सुभेदाराला दोन कोटींचा गंडा! प्रसिद्ध सीए दाम्पत्यासह पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल.
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
- पनवेल: लग्नाच्या तगाद्यातून प्रेयसीची हत्या करून मृतदेह जाळला; दोन महिन्यांनी प्रियकर अटकेत.
राजकीय
- कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप! डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होताच पक्षात बंडाळी; असंतुष्ट नेते दिल्लीला रवाना
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- लंडन: मराठी कुटुंबावर काळाचा घाला; 'एलिफंट अँड कॅसल' येथील ३६ व्या मजल्यावरून पडून दाम्पत्यासह नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू.
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
- ओमान-गुजरात सब-सी गॅस पाइपलाइन: होर्मुझवरील अवलंबित्व संपवून भारताची ऊर्जा सुरक्षा बळकट करणारा एक ऐतिहासिक प्रकल्प!
- लग्नापूर्वीचे शारीरिक संबंध म्हणजे चारित्र्यावर डाग नव्हे; सर्वोच्च न्यायालयाची अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी!

























Subscribe to my channel



