
पुणे: पुणे जिल्हा नियोजन समितीच्या ( डीपीडीसी) बैठकीत शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेला गुंड उपस्थित राहिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या लक्षात हा प्रकार आल्याने त्यांनी कारवाई करुन गुंडाला ताब्यात घेतले.
दरम्यान, तडीपार गुंड बैठकीस उपस्थित कसा राहिला, याचा तपास करण्याचे आदेश डॉ. देशमुख यांनी दिले आहेत. प्रदीप बाजीराव जगताप (वय ६०, रा. सासवड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. जगताप सराईत गुंड असून त्याला पुणे शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले. विधान भवनात सोमवारी पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पालकमंत्री चंद्रकांत पाटील खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, प्रकाश जावडेकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते. जगतापने तडीपारीची कारवाई रद्द करण्यासाठी प्रांतधिकाऱ्यांकडे अपील केले होते. प्रशासनाने त्याचे अपील फेटाळले होते.
जगताप पुण्यात असल्याची माहिती सासवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांना मिळाली होती. सासवड पोलिसांचे पथक जगतापच्या मागावर होते. दरम्यान, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जगताप उपस्थित असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डाॅ. अभिनव देशमुख यांना मिळाली. बैठक सुरू असताना डॉ. देशमुख यांनी सासवड पोलिसांच्या पथकाला ही माहिती दिली. बैठकीत उपस्थित असलेली संशयित व्यक्ती जगताप असल्याची खात्री पटल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. जगताप बैठकीस कसा उपस्थित राहिला, याची चौकशी करण्याचे आदेश डॉ. देशमुख यांनी सासवड पोलिसांना दिले आहेत.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ? नितीश कुमार राज्यसभेवर, भाजपला मुख्यमंत्रीपदाची संधी.
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

