
पुणे : टाइम्स हायर एज्युकेशनतर्फे जागतिक विद्यापीठ क्रमवारी २०२३ जाहीर करण्यात आली. क्रमवारीतील पहिल्या पाचशे विद्यापीठांमध्ये देशातील केवळ पाच संस्थांनाच स्थान मिळवता आले आहे. तर राज्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, (आयसीटी) भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर पुणे), पुण्यातील सिम्बायोसिस आंतराष्ट्रीय विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ यांचा पहिल्या दीड हजार उच्च शिक्षण संस्थांमध्ये समावेश आहे.
टाइम्स हायर एज्युकेशनची जागतिक विद्यापीठ क्रमवारी ही प्रतिष्ठेची मानली जाते. यंदा या क्रमवारीसाठी १०४ देशांतील १ हजार ७९९ विद्यापीठांनी सहभाग घेतला. क्रमवारीमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठ पहिल्या स्थानी, हार्वर्ड विद्यापीठ दुसऱ्या स्थानी आणि केंब्रिज विद्यापीठ आणि स्टॅनफर्ड विद्यापीठ संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानी आहेत. बेंगळुरूची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही देशातील एकमेव संस्था पहिल्या ३५० संस्थांमध्ये स्थान मिळवू शकली. तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्ससह जेएसएस ॲकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रीसर्च, शूलिनी जैवतंत्रज्ञान आणि व्यवस्थापनशास्त्र विद्यापीठ, अलगप्पा विद्यापीठ, महात्मा गांधी विद्यापीठ या पाच संस्थांनाच पहिल्या पाचशे संस्थांमध्ये स्थान मिळाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे स्थान गेल्या वर्षीच्या तुलनेत उंचावले.
गेल्यावर्षी ८०० ते १००० या गटात असलेले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ६०१ ते ८०० या गटात स्थान मिळवले. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ गेल्यावर्षी प्रमाणेच ८०१ ते १००० या गटात कायम राहिले. गेल्यावर्षी ६०१ ते ८०० या गटात असलेली मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे स्थान घसरून यंदा ८०१ ते १००० या गटात गेले. तर आयसर पुणे गेल्यावर्षीच्या ८०१ ते १००० या गटातून घसरून यंदा १००१ ते १२०० या गटात, मुंबई विद्यापीठ गेल्यावर्षीच्या १००० ते १२०० या गटातून घसरून यंदा १२०१ ते १५०० या गटात गेले.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




