
हिंगोली : ‘शेतकऱ्यांचा भरलेला विमा नाकारल्याच्या कारणावरून संताप व्यक्त करत ‘बाळासाहेबांचीशिवसेना’चे आमदार संतोष बांगर व त्यांच्या सहकाऱ्यांनी पीक विमा कार्यालयात गुरुवारी दुपारी तोडफोड केली. नंतर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची भेट घेऊन पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना अडचणीत आणले जात असल्याचे सांगत हा प्रकार कदापीही खपून घेतला जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला.
जिल्ह्यात अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे नुकसानीच्या तक्रारी दाखल केल्या होत्या. मुदतीनंतर काही तक्रारी आल्या. मात्र, काही ठिकाणी अतिवृष्टी झालीच नसल्याचे सांगत विमा कंपनीने नुकसानीच्या तक्रारी फेटाळून लावल्या. सुमारे ३० हजारपेक्षा अधिक तक्रारी फेटाळून लावल्यामुळे शेतकरी चांगलेच संतापले होते. या संदर्भात शेतकऱ्यांनी आमदार संतोष बांगर यांच्याकडे विमा कंपनीबाबत तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर आमदार बांगर यांनी हिंगोलीतील पिकविमा कार्यालयातआपल्या सहकाऱ्यांसह जाऊन फोडतोड केली.
विशेष म्हणजे औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथील शेतकऱ्यांच्या पीकविम्याचा मुद्दा जिल्हाभर गाजत आहे. विमा कंपनीने केलेल्या सर्वेक्षणामध्ये अनेक शेतकरी अर्जावर आपली स्वाक्षरीच नसल्याचे सांगत आहेत. त्यामुळे विमा कंपनीची बनवाबनवी उघड झाली, अशी चर्चा सगळीकडे सुरु आहे.
या प्रकारानंतर गुरुवारी आमदार संतोष बांगर, बाळासाहेब युवासेनेचे जिल्हा प्रमुख राम कदम, पिंटू पतंगे, प्रकाश दराडे, गुड्डू बांगर यांच्यासह शेतकऱ्यांनी थेट विमा कंपनीचे कार्यालय गाठले. यावेळी त्या कार्यालयात कोणीही उपस्थित नव्हते. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या आमदार बांगर यांच्यासह कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली. त्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांना या प्रकरणात लक्ष घालून शेतकऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून सर्वेक्षणाचे अर्ज दाखल करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आमदार बांगर यांनी केली. त्यानंतर आमदार बांगर यांनी जिल्हाधिकारी जितेद्र पापळकर यांचीही भेट घेऊन विमा कंपनीकडून शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्याया संदर्भात चर्चा केली.
खऱ्या अर्थाने अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी पीक विमा मिळेल या आशेवर वेळेत रकमा भरल्या. परंतु शेतावर न जाता परस्पर सर्वे करून अर्जावर बनावट स्वाक्षऱ्या करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. असे प्रकार आता खपवून घेतले जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करा. तसेच विम्याची रक्कम भरणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांना पिकविम्याची रक्कम देण्याबाबत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याच्या सुचना आमदार बांगर यांनी दिल्या.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




