
पीटीआय, सिल्हेट (बांगलादेश) : इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत निर्भेळ यश संपादन केल्यानंतर आत्मविश्वास दुणावलेला भारतीय महिला क्रिकेट संघ धावबादाचा विवाद मागे टाकत महिला आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत आपली लय कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. भारतीय संघाचा सलामीचा सामना शनिवारी श्रीलंकेशी होणार आहे.
भारतीय महिला संघाला नजीकच्या काळात ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. मात्र, या स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. २००४ पासून सुरू झालेल्या आशिया चषक स्पर्धेत भारताने गेले पर्व सोडल्यास प्रत्येक पर्वात जेतेपद मिळवले आहे. भारताने एकदिवसीय प्रकारात चार, तर ट्वेन्टी-२० प्रकारात दोन जेतेपदे पटकावली आहेत. २०१२ पासून आशिया चषक स्पर्धा ट्वेन्टी-२० प्रकारात खेळवली जात आहे. २०१८च्या स्पर्धेत भारताने बांगलादेशकडून हार पत्करली. आता करोनामुळे चार वर्षांनंतर होणाऱ्या या स्पर्धेत भारतीय संघ पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करेल.
बर्मिगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने ऐतिहासिक रौप्यपदक जिंकल्यानंतर या महिन्यात इंग्लंडमध्ये झालेल्या ट्वेन्टी-२० मालिकेत १-२ अशी हार पत्करली. मात्र, हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली या संघाने एकदिवसीय मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवले. भारताकडून हरमनप्रीत आणि स्मृती मानधना चांगली फलंदाजी करत आहेत. शफाली वर्मा, सबिनेनी मेघना आणि दयालन हेमलताकडून भारताला सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा असेल. जेमिमा रॉड्रिग्जचे पुनरागमन झाल्याने भारताच्या फलंदाजीला बळकटी मिळाली आहे. वेगवान गोलंदाजीची धुरा रेणुका सिंग सांभाळेल, तर फिरकीची मदार राधा यादव, राजेश्वरी गायकवाड आणि दीप्ती शर्मा यांच्यावर असेल. दुसरीकडे, श्रीलंकेचा संघ कर्णधार चमारी अटापट्टूवर अवलंबून आहे. हसीनी परेरा आणि हर्षिता समरविक्रमाकडून चमारीला साथीची अपेक्षा असेल.
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात नॉन-स्ट्राईकवरील चार्ली डीनला धावबाद करणे हा भारतीय संघाच्या योजनेचा भाग नव्हता, पण तिला नियमानुसारच धावबाद केल्याचे स्पष्टीकरण भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने दिले. आशिया चषक स्पर्धेपूर्वी दीप्तीचे समर्थन करताना हरमनप्रीत म्हणाली, ‘‘गेल्या काही सामन्यांपासून आम्ही या बाबींवर लक्ष देत आहोत. डीन क्रीजच्या पुढे जात होती आणि दीप्तीने जागरूकता दाखवीत तिला धावबाद केले.तुम्ही मैदानावर असता तेव्हा प्रत्येकाला जिंकायचे असते. मात्र, नियमांनुसार खेळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अशा पद्धतीने फलंदाजाला धावबाद करणे हे नियमांतर्गतच आहे.’’
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




