
पिंपरी चिंचवड : वेदांता – फॉक्सकॉन प्रकल्पावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच खडाजंगी सुरू आहे. त्यांच्यात आरोप प्रत्यारोप झालेले पाहायला मिळत आहेत. वेदांता – फॉक्सकॉन प्रकल्प स्वतः हून महाराष्ट्रात आला होता. तळेगाव येथे हा प्रकल्प होणार होता. पण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली आणि तो प्रकल्प गुजरातला गेला. असे काय घडले त्या बैठकीत ? मविआ सरकारने कमिशन, वसुली मागितली का? हे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट करायला हवे असे भाजप आमदार राम कदम यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात येणारी कंपनी महाविकास आघाडीच्या वसुली कार्यक्रमामुळे सोडून गेली, कंपनीसोबतचा करार झाला असेल तर तो जाहीरपणे दाखवा अन्यथा महाराष्ट्राची दिशाभूल केल्या प्रकरणी आदित्य ठाकरे यांनी माफी मागावी असे आव्हान राम कदम यांनी आदित्य ठाकरेंना दिले आहे. राम कदम पुण्याच्या वडगावमध्ये बोलत होते. ते भाजपच्या ठिय्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.
राम कदम म्हणाले की, महाविकासआघाडी सरकार हे खोटारडे, वसुलीबाज, कमिशनखोर होते. आदित्य ठाकरे हे जे काही बोलले आहेत ते किती खरे आहे खोटे आहे, याचा आज पर्दाफाश होणार आहे. MIDC, प्रशासनाला येथे येऊन सांगावे लागेल की नेमकी वस्तुस्थिती काय आहे. वेदांता- फॉक्सकॉन कंपनी दीड लाख कोटींची गुंतवणूक करणार होती. ती कंपनी अचानक रातोरात का निघून गेली, जाण्याचे काय कारण?, कंपनीच्या मालकांनी त्या वेळच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली होती. त्याभेटीत अस काय ठरले होते? त्यांनी तीन ठिकाणी जागा पाहिल्या, तळेगाव येथील जागा निश्चित देखील केली पण, आदित्य ठाकरे यांना नेमके सांगावे लागेल की जशी तुमच्या सरकारची शंभर कोटींची वसुली संपूर्ण देशाने पाहिली तशी या कंपनीला वसुली, मोठ कमिशन मागितले होते का? या गोष्टींचा खुलासा करावा तुम्हाला करावा लागेल असे राम कदम म्हणाले आहेत.
रातोरात जी कंपनी सर्व काही कबूल करते. स्वतः याठिकाणी येण्याच ठरवते, ती कंपनी निघून का जाते? आदित्य ठाकरे ह्यांनी जी सभा घेतली ती खोटे बोलण्याची सभा होती. खरे काय ते महाराष्ट्राला आज कळेल, ज्यांना स्वतःचे आमदार सांभाळता येत नाहीत. जगाच्या पाठीवर असे कधी घडले नाही की मंत्री सोडून जातात. मंत्री सोडून गेले तरी त्या काळच्या मुख्यमंत्र्यांना कानोकान खबर नाही. हे सरकार फुटक्या पायांचं सरकार होते की ज्या दिवशी सत्तेत आले त्या दिवसापासून एक ही दिवस चांगला राज्याच्या जनतेने पाहिला नाही. लोक करोनामध्ये तडफडून मेली तरी देखील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराच्या बाहेर पडले नाहीत.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




