
पुणे : कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या स्टारबक्स कॉर्पने लक्ष्मण नरसिंहन यांची आगामी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. लक्ष्मण नरसिंहन मूळचे पुण्याचे असल्याने त्यांच्या नियुक्तीमुळे पुणेकर प्रचंड आनंदी असून, सोशल मीडियावर तर मीम्सची लाटच आली आहे. लक्ष्मण नरसिंहनदेखील अभिमानाने मी पुणेकर असल्याचं सांगतात. सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत, त्यांनी आपल्या नियुक्तीनंतर पुणेकरांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे.
मुलाखतीदरम्यान त्यांनी तुम्हाला विश्वास बसणार नाही असे सल्ले मला भारतातून येत आहेत असं सांगितलं. “मी काय केलं पाहिजे, यासाठी मला खूप सल्ले दिले जात आहेत. मी पुण्याचा असून तिथे सर्व दुकानं दुपारी १ ते ४ या वेळेत बंद असतात. त्याच्या सन्मानार्थ मीदेखील १ ते ४ कॅफे बंद ठेवावेत असा सल्ला देत आहेत. पण तसं होणार नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं आहे .
सध्या लंडनमध्ये स्थायिक असलेले नरसिंहन हे त्याआधी अमेरिकेत सिएटल येथे स्थलांतरित होतील. दरम्यान नरसिंहन यांच्यामुळे जागतिक स्तरावर भारतीय वंशाच्या व्यवसाय प्रमुखांच्या वाढत्या यादीत एका पुणेकर व्यक्तीचा समावेश झाला आहे.
लक्ष्मण नरसिंहन यांचा परिचय –
पुण्यात जन्मलेले आणि शिक्षण घेतलेले नरसिंहन यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न अभियांत्रिकी महाविद्यालयातून यांत्रिक अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. पुढे त्यांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील लॉडर इन्स्टिटय़ूटमधून जर्मन आणि आंतरराष्ट्रीय अभ्यास या विषयातून एमए आणि पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या द व्हार्टन स्कूलमधून वित्त व्यवस्थापनाची पदवीही प्राप्त केली आहे. स्टारबक्सने त्यांच्या नियुक्तीसंबंधी निवेदनात, थेट ग्राहकांना तोंड देणाऱ्या जागतिक नाममुद्रांच्या नेतृत्व आणि सल्ला देण्याचा नरसिंहन यांच्याकडे जवळपास ३० वर्षांचा अनुभव आहे, असे नमूद केले आहे.
‘अविरत प्रवाह’
नव्या नियुक्तीसह लक्ष्मण नरसिंहन हे मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला, अॅडोबचे शंतनू नारायण, अल्फाबेटचे सुंदर पिचई आणि ट्विटरचे प्रमुख पराग अग्रवाल यांच्यासह अमेरिकास्थित जागतिक आघाडीच्या कंपन्यांमध्ये भारतीय वंशाच्या व्यक्तीची नेतृत्वपदी वर्णी लागण्याच्या वाढत्या गौरवास्पद सूचीत सामील झाले आहेत. इंद्रा नूयी यांनी २०१८ मध्ये पायउतार होण्यापूर्वी १२ वर्षे पेप्सिकोच्या मुख्याधिकारी म्हणून काम केले होते. मिहद्र समूहाचे अध्यक्ष आनंद मिहद्र यांनी गुरुवारी ट्वीटद्वारे स्टारबक्सवरील नियुक्तीबद्दल नरसिंहन यांचे अभिनंदन करताना, ते एका ‘अविरत प्रवाहा’चा भाग बनल्याचे नमूद केले. ‘थेंबे थेंबे सुरुवात झालेला हा प्रवाह आता त्सुनामी लाटेत बदलत चालला आहे आणि जगातील सर्वात प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये भारतीय वंशाच्या मुख्याधिकाऱ्याची नियुक्ती हा आता न थांबवता येणारी गोष्ट बनली आहे,’ अशी टिप्पणीही त्यांनी केली.
ब्रिटनस्थित रेकिट बेंकिसर या ग्राहक आरोग्य, स्वच्छता आणि पोषण क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ५५ वर्षीय नरसिंहन हे कार्यरत होते. लायझॉल जंतुनाशक ते डय़ुरेक्स कन्डोम बनविणाऱ्या या कंपनीच्या प्रमुख पदावरून पायउतार होत असल्याचे आदल्या दिवशी नरसिंहन यांनी जाहीर केले आणि लंडनच्या भांडवली बाजारात सूचिबद्ध या कंपनीच्या समभाग मूल्यात त्या परिणामी ४ टक्क्यांची मोठी घसरण दिसून आली. प्रत्यक्षात ते ३० सप्टेंबपर्यंत रेकिटच्या प्रमुखपदी कायम असणार
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


