पुणे : दारूच्या नशेत स्टंटबाजी करणे जीवावर बेतलं ; पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू ; मृत्यू झालेल्या व्यक्ती मानसिक आजाराने ग्रस्त असल्याची पोलिसांची माहिती

पिंपरी- चिंचवडमध्ये मद्यपान केलेला व्यक्ती साडीने पाचव्या मजल्यावरून खाली उतरत असताना त्याचा खाली कोसळून मृत्यू झाला आहे. ही घटना निगडी ओटास्कीम येथे बुधवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अनिल सुदाम कांबळे वय- ५० अस मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अनिल हे मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचं निगडी पोलिसांनी सांगितल आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेले अनिल सुदाम कांबळे वय- ५० वर्षे हे दररोज मद्यपान करायचे. ते आणि त्यांची पत्नी निगडी ओटा स्कीम येथील प्रेरणा सोसायटी येथे पाचव्या मजल्यावर राहतात आहेत. काल बुधवारी सायंकाळी साडेचार वाजता दारूच्या नशेत अनिल कांबळे यांनी घराच्या खिडकीतुन साडी च्या साहाय्याने खाली उतरण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचा हाथ निसटल्याने ते थेट खाली कोसळले यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. असंवेदनशील बाब म्हणजे बघ्यांनी या सर्व प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. अनिल यांना वाचवण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *