
पुणे : अतिरिक्त उसाचे गाळप वेळेत आणि नियोजनपूर्वक करण्यासाठी राज्यातील साखर कारखान्यांचे प्रशासन जोमाने कामाला लागले आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर म्हणजे पाच ऑक्टोबरला कारखान्यांचे बॉयलर पेटवून कामगार कामावर रुजू होताच कारखाने सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. मागील गळीत हंगामात कोल्हापूर विभाग वगळता सर्वत्र आणि विशेषकरून मराठवाडय़ात गळीत हंगाम १३ जूनपर्यंत सुरू होता. उन्हाळय़ाच्या दिवसांत ऊसतोडणी मजुरांची मोठी टंचाई, घटणारा साखर उतारा आणि कारखाने पूर्ण क्षमतेने न चालल्यामुळे यंदा कारखान्यांसह शेतकऱ्यांनाही मोठय़ा प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले. हे सर्व द्रविडी प्राणायाम टाळण्यासाठी विशेषकरून मराठवाडय़ातील कारखानदार दसऱ्याच्या मुहूर्तावर कारखान्यांची धुराडी पेटवून कामगार कामावर रुजू होताच गळीत हंगाम सुरू करण्याचे नियोजन आहे.
या बाबत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर म्हणाले, ‘‘यंदाचा गळीत हंगाम काहीही करून ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात सुरू करावाच लागणार आहे. पाच ऑक्टोबरला दसरा आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर कारखान्यांची धुराडी पेटविण्याचे नियोजन आहे. पण, ऊसतोडणी मजूर दसरा झाल्याशिवाय कामावर येणार नाहीत. ते कामावर येताच हंगाम सुरू करणार आहोत.’’
आर्थिक कसरत करावी लागणार
केंद्र सरकारने उसाच्या रास्त आणि किफायतशीर दरात (एफआरपी) वाढ केली आहे. इंधन दरवाढीमुळे सर्वच घटकांची महागाई झाली आहे. साखरेचा प्रति किलो उत्पादन खर्च ३५ ते ३६ रुपये असताना साखर ३१ रुपये प्रति किलो दराने विकावी लागत आहे. एफआरपी वाढवली तरी साखर विक्री दरात वाढ केलेली नाही. त्यामुळे साखर जास्त तयार केली तर कारखाने जास्त तोटय़ात जातात. त्यामुळे अपेक्षित साखर उत्पादन झाले, की उर्वरित साखर इथेनॉल निर्मितीकडे वळवावी लागणार आहे. यंदा जागतिक परिस्थिती साखर निर्यातीस पोषक होती. पण, पुढील हंगामात अशी स्थिती राहील, याची कोणतीही शाश्वती नाही. भारतीय साखर जगात सर्वात महाग असते. त्यामुळे कारखानदारांना जागतिक बाजारात साखर विक्री करण्यासाठी केंद्राने मदत करणे गरजेचे असते. आता साखर निर्यात बंद असली तरीही ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपासून पुन्हा साखर निर्यात सुरळीत सुरू होण्याची शक्यता आहे, असेही जयप्रकाश दांडेगावकर म्हणाले.
यंदाचा गळीत हंगाम ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात सुरू करावाच लागणार आहे. मराठवाडय़ातील कारखान्यांना अतिरिक्त ऊस गाळपाचे नियोजन करावे लागणार आहे. इथेनॉल निर्मिती, बायो सीएनजी सारखे पर्याय कारखान्यांना सक्षमपणे हाताळावे लागणार आहेत. मागील हंगामासारखा हा हंगाम आर्थिकदृष्टय़ा सोयीचा जाईलच असे नाही. जागतिक घडामोडींचा हंगामावर मोठा परिणाम होत असतो. केंद्राने साखर विक्री दरात वाढ करायला हवी.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


