अजित पवारांच्या उपस्थितीत शनिवारी चिंचवडला राष्ट्रवादीचा मेळावा ; निवडणुकीच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांशी संवाद

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी (६ ऑगस्ट) चिंचवडला राष्ट्रवादीचा मेळावा होणार आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या मेळाव्याच्या निमित्ताने राष्ट्रवादीकडून जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू आहे.
चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाट्यगृहात शनिवारी दुपारी दोन वाजता हा मेळावा होणार आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने अजित पवार कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

यासंदर्भात शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी सांगितले,की महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णपणे तयार आहे. पालिकेतील भाजपची सत्ता उलथवून लावण्याचा निर्धार राष्ट्रवादीने केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘निर्धार विजयाचा, संवाद कार्यकर्त्यांचा’ हे ब्रीद वाक्य घेऊन निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. त्यासाठी शनिवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत ‘कार्यकर्ता संवाद’ मेळावा होणार आहे. पालिकेतील भाजपच्या सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराला शहरातील जनता वैतागली आहे. शहराच्या विकासाला गती देण्यासाठी राष्ट्रवादी हाच पर्याय आहे, असे गव्हाणे म्हणाले.

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *