
पुणे : मुंबईमध्ये भारतातील पहिली रेल्वे धावल्यानंतर पुढील पाच ते सहा वर्षांतच पुण्याची रेल्वे सुरू झाली. पुणे हे लष्कराचे प्रमुख ठाणे असल्याने ब्रिटिशांनी पुण्यातील रेल्वेसाठी विशेष लक्ष दिले. त्यातूनच रेल्वे स्थानकासाठी विशेष रचनेची एक देखणी इमारत उभी राहिली आणि मोठ्या दिमाखात तिचे उद्घाटन झाले, तो दिवस होता २७ जुलै १९२५. ऐतिहासिक वारसा लाभलेली ही इमारत बुधवारी ९८ व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. पुणे स्थानकाच्या इमारतीचा पहिला आराखडा पी. विल्सन यांच्या मार्गदर्शनाखाली १९१५ मध्ये तयार करण्यात आला होता. त्यानंतर १९२२ मध्ये इमारतीचे काम सुरू करण्यात आले. पुढील तीनच वर्षांत मुख्य अभियंता जेम्स बेर्कक्ले यांच्या नियोजनाखाली बांधकाम पूर्ण झाले. इमारतीचे उद्घाटन मुंबईचे गव्हर्नर सर लेस्ली विल्सन यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या समारंभासाठी मुंबईहून एक विशेष रेल्वे करण्यात आली होती. ही इमारत बांधण्यासाठी त्या वेळी पाच लाख ७९ हजार ६६५ रुपये इतका खर्च आला होता. पुणे स्थानकाच्या आराखड्यानुसार लाहोर रेल्वे स्थानकाची इमारतही उभारण्यात आली.
पुण्याच्या इमारतीला काही वर्षांपूर्वी मॉडेल रेल्वे स्थानक म्हणूनही मान्यता मिळालेली आहे. त्याचप्रमाणे या इमारतीला ऐतिहासिक वास्तूचा दर्जाही मिळालेला आहे. इमारतीच्या उद्घाटनानंतर १९२९ मध्ये पुणे स्थानकावरून विजेवरील रेल्वे धावली. १९३० मध्ये जागतिक कीर्तीची डेक्कन क्वीन गाडी सुरू झाली. आशिया खंडातील पहिली डबल डेकर सिंहगड एक्स्प्रेसही त्याच दरम्यान सुरू झाली. अशा अनेक गोष्टींचा व रेल्वेच्या वाढत्या व्यापाची साक्षीदार असलेली ही इमारत बुधवारी ९७ वर्षे पूर्ण करून ९८ व्या वर्षात पदार्पण करीत आहे.
पुणे स्थानकाचा संपूर्ण इतिहास तोंडपाठ असलेल्या रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा या दरवर्षी इमारतीचा वाढदिवस साजरा करतात. त्यानुसार यंदाही त्या या वाढिदवसासाठी पुढाकार घेणार आहेत. सकाळी स्थानकात फलाट क्रमांक एकवर केक कापून मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
अनेक घटनांची साक्षीदार
पुणे शहर आणि परिसराचा गेल्या ९७ वर्षांत विविध अंगांनी कालापालट झाला. प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. पुणे रेल्वे स्थानकासाठी नवी इमारत बांधण्यात आली तेव्हा स्थानकातून दिवसभरात केवळ २० गाड्या ये-जा करीत होत्या. आता ही संख्या साडेतीनशे गाड्यांहूनही अधिक झाली आहे. या ऐतिहासिक इमारतीने पानशेतचा पूर, कोयनेचा भूकंप असे विविध धक्केही अनुभवले आहेत.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




