
पुणे : पालघरमध्ये झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय आणि खबरदारीसाठी केंद्रीय तज्ज्ञ आणि कीटक शास्त्रज्ञांचे पथक महाराष्ट्रात येऊन दाखल झाले आहे. ताप आल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांना दाखवावे आणि डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन या पथकाकडून करण्यात आले आहे.
डासांपासून उद्भवणाऱ्या झिका या विषाणूचा यावर्षीचा पहिला रुग्ण पालघर जिल्ह्यात आढळून आला आहे. तेथील तलासरी तालुक्यातील आश्रम शाळेत एका नऊ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून केंद्राचे एक पथक महाराष्ट्रात दाखल झाले असून या पथकामध्ये पुणे आणि दिल्ली येथील तज्ज्ञांचा समावेश आहे. राज्याचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. महेंद्र जगताप यांनी याबाबत माहिती दिली.
डॉ. महेंद्र जगताप म्हणाले, पालघर जिल्ह्यातील गावात झिकाचा रुग्ण आढळल्यानंतर तीन किलोमीटरच्या क्षेत्रातील पाच गावांमध्ये सर्वेक्षण करण्यात येत आहे. या गावांमधील आठ रुग्णांच्या रक्ताचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठवण्यात आले आहेत. डास अळय़ांच्या नमुन्यांचाही यामध्ये समावेश आहे. डॉ. जगताप म्हणाले, ताप येणे, अंगावर पुरळ येणे, डोळे येणे, अंगदुखी, थकवा, डोकेदुखी ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. लक्षणे सौम्य असतात आणि दोन ते सात दिवसांपर्यंत राहतात. लक्षणे असलेल्या रुग्णांनी पॅरासिटामॉलसारखे औषध, संपूर्ण विश्रांती आणि भरपूर पाणी पिणे आवश्यक असल्याचे डॉ. जगताप यांनी स्पष्ट केले. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी असे रुग्ण आढळल्यास त्यांचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून तपासून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




