फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलच्या नावावर मोठा सायबर स्कॅम! व्हॉट्सॲपवरील बनावट ऑफर्स आणि फसव्या लिंकपासून राहा सावध

सध्या देशात ई-कॉमर्स जायंट 'फ्लिपकार्ट'ची बहुप्रतिक्षित 'बिग बिलियन डेज सेल' (Flipkart Big Billion Days 2026) मोठ्या उत्साहात सुरू आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स, टीव्ही, एसी आणि लाइफस्टाइल उत्पादनांवर बंपर डिस्काउंट मिळत असल्यामुळे ग्राहकांची खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. मात्र, या फेस्टिव्ह सीजनचा फायदा घेत सायबर गुन्हेगारांनीही (Cyber Criminals) ग्राहकांना गंडवण्यासाठी नवीन क्लृप्त्या सुरू केल्या आहेत. फ्लिपकार्टच्या ब्रँडिंगचा आणि लोगोचा गैरवापर करून सोशल मीडियावर आणि विशेषतः व्हॉट्सॲपवर (WhatsApp) खोट्या व आकर्षक ऑफर्सचे मेसेज पाठवले जात आहेत. याप्रकरणी कंपनीने स्वतः एक गांभीर्यपूर्वक 'स्कॅम अडव्हायझरी' जारी करून ग्राहकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

स्कॅमर्स व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अत्यंत स्वस्त किंमतीत महागडे स्मार्टफोन, बंपर डिस्काउंट, मोफत गिफ्ट्स किंवा लकी ड्रॉ जिंकल्याचे आमिष दाखवणारे मेसेज पसरवत आहेत. या मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यावर वापरकर्त्यांना अगदी हुबेहूब फ्लिपकार्टसारख्याच दिसणाऱ्या बनावट (Fake) वेबसाईटवर नेले जाते. तिथे गेल्यानंतर नाव, मोबाईल नंबर, पत्ता आणि इतर वैयक्तिक माहिती मागितली जाते. तसेच काही प्रकरणांमध्ये फसव्या पेमेंट पेजच्या माध्यमातून नागरिकांची बँक खाती खाली करण्याचे प्रकारही समोर येत आहेत. फ्लिपकार्टने स्पष्ट केले आहे की, कंपनी कधीही अशा प्रकारे कोणत्याही थर्ड पार्टी मेसेज किंवा लिंक्सद्वारे बक्षिसे किंवा मोफत ऑफर्सची घोषणा करत नाही. त्यामुळे कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक न करता केवळ अधिकृत ॲप किंवा वेबसाईटवरूनच खरेदी करावी आणि फसवणूक झाल्यास तातडीने सायबर हेल्पलाइन नंबर '१९३०' वर संपर्क साधावा.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *