पुणे: जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात आणि आसपासच्या ग्रामीण भागात हवामानातील बदलांमुळे आणि पावसाने ऐन वेळी दडी मारल्यामुळे शेती क्षेत्रासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. पावसाअभावी पिके पिवळी पडून करपू लागल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अशातच, इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांच्या पद्धतीला फाटा देत एक अत्यंत वेगळा आणि फायदेशीर व्यावसायिक हिशेब मांडला आहे. मक्याच्या दाण्यांपासून किंवा कणसांपासून भाकरी किंवा इतर अन्नधान्य मिळवण्याऐवजी, आता येथील शेतकरी संपूर्ण मक्याचे पीक जनावरांच्या मुरघासासाठी (Silage) जागेवरच विकण्याला प्राधान्य देत आहेत.
काय आहे नेमका बदल आणि शेतकऱ्यांचा हिशेब? पारंपरिक पद्धतीने मक्याची लागवड केल्यानंतर कणीस पक्के होणे, त्याची काढणी करणे, मळणी करणे आणि बाजारात विक्रीसाठी नेणे यामध्ये मोठा खर्च आणि वेळेचा अपव्यय होतो. त्यातच हवामानाची अनिश्चितता आणि पावसाचा लहरीपणा यामुळे हातात काहीच पडणार नाही, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी इंदापुरातील शेतकऱ्यांनी एक सोपा पर्याय निवडला आहे. पिकाची पूर्ण वाढ होण्याआधी किंवा निसवणीच्या काळात, मक्याचे हिरवेगार उभे पीक थेट दूध उत्पादक प्रकल्प, गोठा चालक किंवा मुरघास (Silage) तयार करणाऱ्या व्यावसायिकांना जागेवरच विकले जात आहे.
या पद्धतीमुळे शेतकऱ्यांना मक्याची कणीस तयार होण्याची वाट पाहावी लागत नाही. पीक सुकण्यापूर्वी किंवा करपण्यापूर्वीच कमी कालावधीत रोख पैसे हातात पडतात. तसेच मळणीचा आणि बाजारपेठेत वाहतूक करण्याचा खर्च पूर्णपणे वाचतो. जनावरांसाठी पौष्टिक असा 'मुरघास' बनवण्यासाठी आजकाल बाजारात मक्याच्या हिरव्या पिकाला प्रचंड मागणी आहे. त्यामुळे धान्याच्या उत्पन्नापेक्षा जागेवरच संपूर्ण झाडासह मका विकणे शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशीर आणि खात्रीशीर आर्थिक उत्पन्नाचा स्रोत ठरत आहे.
बाजारातील आवक घटण्याची शक्यता: शेतकऱ्यांनी मक्याच्या पारंपरिक धान्योत्पादनापेक्षा मुरघासासाठी उभे पीक विकण्याचा हा नवा ट्रेड स्वीकारल्यामुळे आगामी काळात खुल्या बाजारात मक्याच्या दाण्यांची आवक रोडावण्याची मोठी शक्यता वर्तवली जात आहे. पोल्ट्री उद्योगासाठी आणि पशुखाद्यासाठी लागणाऱ्या मक्याच्या पुरवठ्यावर याचा परिणाम होऊ शकतो. मात्र, निसर्गाच्या लहरीपणाशी दोन हात करत इंदापुरातील शेतकऱ्यांनी काढलेले हे व्यावसायिक गणित सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरले असून, संकटाच्या काळात उत्पन्नाचा हा नवा मार्ग इतर भागातील शेतकऱ्यांसाठीही मार्गदर्शक ठरत आहे.
शहर
- नाशिक: प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! १७ ऑक्टोबर रोजी नाशिक-मुंबई रेल्वेसेवेला बसणार मोठा 'ब्रेक'; अनेक गाड्या रद्द किंवा विचलित!
- पुणे: तो उकीरडा बुद्धीचा माणूस ; MPSC आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या विवेकानंद पाटलांची भाजप प्रवक्त्यांवर अत्यंत बोचरी टीका!
- पुणे: MPSC आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रंगला नवा राजकीय सामना; रोहिणी खडसे आणि चित्रा वाघ आमनेसामने
- पुणे: तात्काळ आंदोलनस्थळ रिकामे करा; पुण्यात सुरू असलेल्या MPSC आंदोलनाविरोधात नागरिक पोहोचला उच्च न्यायालयात; हायकोर्टाकडून प्रशासनाला आणि आयोजकांना कारणे दाखवा नोटीस जारी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: मुसळधार पावसाचे तांडव! कुडाळमध्ये ओहोळात वाहून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, करूळ घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
- पुणे: अजितदादा खूप मोठ्या मनाचे होते, पण मी दादांसारखी नाही; पुरुषोत्तम जगतापांना लक्ष्य करत सुनेत्रा पवारांचा कडक इशारा!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नाशिक: प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! १७ ऑक्टोबर रोजी नाशिक-मुंबई रेल्वेसेवेला बसणार मोठा 'ब्रेक'; अनेक गाड्या रद्द किंवा विचलित!
गुन्हा
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनादरम्यान आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश; राहुल आणि प्रियंका गांधींव्यतिरिक्त इतर नेत्यांवर गुन्हा दाखल!
- बेंगळुरु: हिंदी शिकत नसाल तर नोकरी सोडून निघून जा; बंगळुरुच्या वेअरहाऊसमध्ये भाषिक वाद विकोपाला, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल अन् मोठा संताप
- नवी दिल्ली: मोठ्या बंदोबस्तात महिलांशी गैरव्यवहार ; दिल्लीतील 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सरकारवर गंभीर आरोप
- नवी दिल्ली: हे आपण करून दाखवणारच ; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनाची २५ वर्षे पूर्ण, विकसित भारत २०४७' च्या संकल्पावर भर























Subscribe to my channel




