पुणे: विद्येचे माहेरघर असून राज्यभरातून लाखो विद्यार्थी येथे आपले करिअर घडवण्यासाठी आणि उच्च शिक्षणासाठी येतात. मात्र, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे राजकीय भांडवल करून कोणी शहराला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत असेल, तर पुणेकर ते कधीही सहन करणार नाहीत. आमदार रोहित पवार यांनी हिंमत असेल तर पुणे शहर बंद पाडून दाखवावेच, मग त्यांना कळेल की पुणेकर नेमके काय आहेत, अशा शब्दांत पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी आमदार रोहित पवार यांना थेट आणि आक्रमक आव्हान दिले आहे.
महापौर मंजुषा नागपुरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली. त्या म्हणाल्या की, "पुण्यात गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय मुद्द्यांवरून आणि आंदोलनावरून वातावरण तापले आहे. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे हा लोकशाहीचा अधिकार आणि भाग असला, तरी सामान्य नागरिकांना वेठीस धरून, वाहतूक व्यवस्था कोलमडून आणि दैनंदिन जनजीवन विस्कळीत करून विद्यार्थ्यांचे भले कधीही साध्य होणार नाही. आमदार रोहित पवार यांनी पुणे बंदची हाक दिली आहे, परंतु त्यांनी हे लक्षात ठेवावे की पुणेकर काय आहेत हे त्यांना अशा फुटकळ आंदोलनांतून नक्कीच समजावून सागू. इथून पुढे पुणेकर नागरिकांच्या आणि शहराच्या विरोधातील कोणतेही राजकीय आंदोलन किंवा शहराची कोंडी अजिबात सहन करणार नाही, आणि आम्ही पुणे शहर कोणत्याही परिस्थितीत बंद पडू देणार नाही."
यावेळी विद्यार्थ्यांनी राजकीय नेत्यांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे भावनिक व कडक आवाहन त्यांनी केले. त्या म्हणाल्या की, राज्यभरातील पालक अत्यंत कष्ट करून, रक्ताचे पाणी करून आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी पुण्यात पाठवतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा राजकीय नेत्यांच्या नादी लागून स्वतःचे उज्ज्वल भवितव्य धोक्यात घालू नये. काही ठराविक नेत्यांच्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी आणि स्वार्थासाठी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून स्वतःचे नुकसान करून घेऊ नये, तर विद्यार्थ्यांनी केवळ आपल्या अभ्यासावर आणि भविष्यातील करिअरवर पूर्ण लक्ष केंद्रित केले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.
नेमका वाद काय आहे?
दरम्यान, एमपीएससीचे अध्यक्ष डॉ. विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्यावरून आणि स्पर्धा परीक्षांच्या विविध मुद्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. पेपरफुटीच्या आणि कारभारातील अनियमिततेच्या प्रकरणातून स्वतःची पाठराखण करण्यासाठी व अंग काढून घेण्यासाठी सरकारने अध्यक्षांवर दबाव वाढवत हा राजीनामा घेल्याचे आरोप त्यांनी केले होते. तसेच जर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या हिताचा योग्य निर्णय झाला नाही, तर आम्ही तीव्र आंदोलन पुकारून पुणे शहर पूर्णपणे बंद पाडू, असा सज्जड इशारा आमदार रोहित पवार यांनी सरकारला दिला होता.
रोहित पवार यांच्या याच इशाऱ्याला पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी अत्यंत आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिले असून, महायुती आणि विरोधकांमधील हा कलह आता चांगलाच पेटला आहे. या राजकीय संघर्षामुळे आगामी काळात पुण्यातील वातावरण आणखी तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शहर
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: लोणावळ्यात मोठी दुर्घटना! रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या ३३ वर्षीय मुलाचा मृत्यू
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
महाराष्ट्र
- अमरावती: प्राध्यापक भरतीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार; १०० टक्के पारदर्शकतेसाठी 'महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण आयोग' स्थापन करण्याची 'डाटा'ची मागणी
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- हिंगोली: सोयाबीन पिकाची नासाडी डोळ्यांसमोर पाहून वसमतमधील ६० वर्षीय शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टीची अत्यंत मोठी घोषणा; थेट १० ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलनाचे रणशिंग, सरकारची वाढली डोकेदुखी
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान




















Subscribe to my channel


