नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) एक मोठा राजकीय निर्णय घेत विद्यमान आठही जागांवर नवीन चेहरे मैदानात उतरविले आहेत. या धोरणात्मक बदलामुळे केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी आणि केंद्रीय राज्यमंत्री बी. एल. वर्मा यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी नाकारली आहे.

या यादीत हरदीप सिंह पुरी आणि बी. एल. वर्मा यांच्याशिवाय अरुण सिंह, सीमा द्विवेदी, नीरज शेखर, बृजलाल आणि गीता शाक्य यांसारख्या विद्यमान खासदारांनाही पुन्हा संधी मिळालेली नाही. तसेच, दिनेश शर्मा यांनी यापूर्वीच आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन अंदमान-निकोबारचे नायब राज्यपालपद स्वीकारले असल्याने ती जागा आधीच रिक्त झाली होती. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांना पुन्हा राज्यसभेवर न पाठविण्याच्या पक्षाच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना यामुळे पुन्हा उधाण आले आहे.

आठ नवे चेहरे कोणते? भाजपने आगामी निवडणुकांसाठी उत्तर प्रदेशातून पूर्णपणे नवीन नेतृत्वाला संधी दिली आहे. पक्षाने धर्मपाल सिंह, राधाकांत ओझा, प्रकाश पाल, विद्यासागर सोनकर, गोपी कृष्ण पांडेय, प्रियंका सिंह रावत, राम प्रताप सिंह चौहान आणि श्रुती गंगवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या नव्या यादीमध्ये सामाजिक समीकरणांचा समतोल साधत तीन इतर मागासवर्गीय (OBC) आणि दोन अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे रणनीतिक धोरण स्पष्ट होते.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *