वूमन्स आशिया कप रायजिंग स्टार्स 2026 स्पर्धेत उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने राधा यादव हीच्या नेतृत्वात श्रीलंकेवर मात केली. भारताने यासह अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. तर उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने होते. त्यामुळे बांगलादेशचा पराभव झाला असता तर चाहत्यांना अंतिम सामन्यात साखळी फेरीनंतर पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबल्याचा थरार पाहायला मिळाला असता. मात्र तसं झालं नाही. बांगलादेशने पाकिस्तानवर मोठ्या फरकाने विजय मिळवला. बांगलादेशने या विजयासह अंतिम फेरीत धडक दिली. या सामन्याच्या निकालासह अंतिम फेरीचंही चित्र स्पष्ट झालं.
बांगलादेशला पाकिस्तानसमोर 6 च्या रन रेटनेही धावा करता आल्या नाहीत. पाकिस्तानच्या गोलंदाजांसमोर बांगलादेशला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 110 धावांपर्यंतच पोहचता आलं. त्यामुळे पाकिस्तान सहज 111 धावा करुन जिंकेल, असं चित्र होतं. मात्र बांगलादेशने कहर केला. पाकिस्तानला बांगलादेशने 16.4 ओव्हरमध्ये 56 रन्सवर गुंडाळलं. बांगलादेशने अशाप्रकारे हा सामना 54 धावांनी जिंकला.
पहिल्या डावात काय झालं?
पाकिस्तानने टॉस जिंकून बांगलादेशला बॅटिंगसाठी भाग पाडलं. बांगलादेशची कॅप्टन फातिमा खातून हीने सर्वाधिक धावा केल्या. कॅप्टनने केलेल्या नाबाद 40 धावांच्या जोरावर बांगलादेशला 110 धावांपर्यंत पोहचता आलं. पाकिस्तानसाठी कॅप्टन हाफसा खालिद हीने सर्वाधिक 2 विकेट्स मिळवल्या. तर इतर चौघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
बांगलादेशसमोर पाकिस्तान ढेर
बांगलादेशच्या गोलंदाजांसमोर पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाला विजयी धावांचा पाठलाग करताना 15 हा आकडाही गाठता आला नाही. शव्वाल झुल्फिकार हीने सर्वाधिक 14 धावा केल्या. हाफसा खालिदने 12 धावांचं योगदान दिलं.तर युसरा आमिर 11 धावा करुन आऊट झाली. दोघींना भोपळाही फोडता आला नाही. तर इतरांनी बांगलादेशसमोर गुडघे टेकले.
बांगलादेशची जबरदस्त कामगिरी
पाकिस्तान विरुद्ध बांगलादेशच्या एकूण 6 खेळाडूंनी बॉलिंग केली. त्यापैकी शोरिफा खातून हीचा अपवाद वगळता इतर 5 गोलंदाजांनी विकेट घेण्यात यश मिळवलं. संदिजा मेघला सर्वाधिक विकेट्स मिळल्या. संजिदाने 3.4 ओव्हरमध्ये फक्त 1.60 च्या इकॉनमीने फक्त 6 धावा देत 3 विकेट्स मिळवल्या. फातिमा खातून हीने दोघींना बाद केलं.तर फरीहा त्रिस्ना, फातेमा सोनिया आणि फरजाना एसमिन या तिघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली. आता आशिया कप ट्रॉफीसाठी रविवारी 22 फेब्रुवारीला भारत विरुद्ध बांगालदेश यांच्यात महामुकाबला होणार आहे.
शहर
- मुंबई: अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता आता तुकाराम मुंढेंच्या रडारवर!
- पुणे: बारामतीच्या प्रकाशवैभवाचा जगभर डंका! काशीविश्वेश्वर पुलाच्या 'कॅनोपी ऑफ लाइट्स' प्रकल्पाला मानाचा आंतरराष्ट्रीय 'लाईट जस्टिस अवॉर्ड २०२६' जाहीर!
- पुणे: दहीहंडी वाहतूक अलर्ट; शहरात मोठे वाहतूक बदल आणि निर्बंध लागू, प्रशासनाकडून पर्यायी मार्गांची घोषणा!
- पुणे: हो, आमच्याकडून चुका झाल्या, आवाज आणि स्पर्धा वाढली, आता नियमांचे पालन करू गणेशोत्सवापूर्वी पुणे साऊंड व्यावसायिकांची मोठी कबुली!
महाराष्ट्र
- मुंबई: अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता आता तुकाराम मुंढेंच्या रडारवर!
- पुणे: बारामतीच्या प्रकाशवैभवाचा जगभर डंका! काशीविश्वेश्वर पुलाच्या 'कॅनोपी ऑफ लाइट्स' प्रकल्पाला मानाचा आंतरराष्ट्रीय 'लाईट जस्टिस अवॉर्ड २०२६' जाहीर!
- सिंधुदुर्ग: दोडामार्गात 'ओंकार' हत्तीचे प्रचंड तांडव! शेती आणि बागायतीचे मोठे नुकसान, ग्रामीण भागात भीतीचे वातावरण!
- चिपळूण: महसूल विभागात खळबळ! जमिनीच्या फेरफार नोंदीसाठी १० हजारांची लाच घेताना मंडल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात!
गुन्हा
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
- सांगली: पलूसमध्ये घरगुती वादातून पती-पत्नीचे टोकाचे पाऊल; विषारी औषध प्राशन करून दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू
- उत्तर प्रदेश: आग्रा येथे संतापजनक प्रकार! माजी राष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडूवर पतीकडून हॉटेलमध्ये चाकूने प्राणघातक हल्ला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- अयोध्या: राम मंदिरात ऐतिहासिक निर्णय; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या सीईओ पदी नियुक्ती
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड
- उत्तराखंड: पूर आलेली नदी पार करताना हातातून निसटली चिमुकली, लेकीला वाचवण्यासाठी आईने पाण्यात मारली उडी अन् दोघींचाही मृत्यू
- चेन्नई: थलपती विजय भारताचे पंतप्रधानच काय, अमेरिकेचे अध्यक्षही होऊ शकतात; ई. पलानीस्वामींचा उपरोधिक टोला



























Subscribe to my channel




