
सांगली : संपुर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या मिरज तालुक्यातील म्हैसाळमधील आत्महत्या प्रकरणामध्ये आता एक धक्कादायक खुलासा झाला आहे. म्हैसाळमधील उच्चशिक्षित आणि सधन कुटुंबातील ९ लोकांनी एकाच वेळी आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवल्याचं सांगण्यात आलं होत.
मात्र, या ९ जणांनी आत्महत्या केली नव्हती तर त्यांची हत्या झाल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. या हत्याकांड प्रकरणी दोन व्यक्तीना अटक देखील करण्यात आली आहे. म्हैसाळमधील त्या घरातील लोकांनी आत्महत्या केली नव्हती तर त्या नऊ लोकांच्या जेवणात विष घालून त्यांना मारल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केल्याची माहीती सांगली पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली आहे.
या हत्याकांडाप्रकरणी आब्बास महमंदअली बागवान वय ४८ वर्षे रा. मुस्लीम बाशा पेठ, मुलेगाव रोड, सरवदेनगर सोलापुर आणि धीरज चंद्रकांत सुरवशे वय ३० वर्षे रा. वसंत विहार ध्यानेश्वरी नगर, प्लॉट नं ५९ जुना पुणा नाका, सोलापूर यांना अटक करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण -
संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशाला हादरवून सोडणारी घटना मिरज तालुक्यातील म्हैसाळ या ठिकाणी घडली होती. एकाच कुटुंबातील तब्बल ९ जणांच्या परिवाराने एकाच वेळी विष प्राशन करून आत्महत्या केली होती.
हे सर्वजण उच्चशिक्षित होते, पशुवैद्यकीय डॉक्टर असणारे माणिक वनमोरे व त्यांचे शिक्षक बंधू पोपट वनमोरे, या दोघांनी आपली आपल्या आई, पत्नी व मुलांच्या समवेत सामूहिक आत्महत्या केल्याने एकाच खळबळ उडाली होती. दोन्ही कुटुंबांनी आपल्या घरामध्ये एकाच वेळी विष पिऊन हे आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज लावण्यात आला होता.
शिवाय ही आत्महत्या नेमकी कोणत्या कारणाने झाली की तो घातपात याबाबत अनेक तर्कवितर्क देखील व्यक्त करण्यात येत होते. वनमोरे बंधूंवर कोट्यवधी रुपयांचं कर्ज झाले होते. या कर्जाच्या वसुलीचा तगादा आणि सावकारीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचं बोललं जात होतं. त्याचबरोबर गुप्तधनाच्या लालसेपोटी कुटुंबाने पैसे एक मांत्रिकावर लुटवले होते. त्यातून कंगाल होऊन कर्ज झालं असल्याच्या चर्चाही त्यावेळी रंगल्या होत्या. मात्र आता पोलिसांच्या तपासामध्ये त्या कुटुंबाने आत्महत्या नव्हे तर त्यांची हत्या केल्याचं समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




