
पुणे : नैर्ऋत्य मोसमी पावसाने विदर्भासह महाराष्ट्रातील ९९ टक्के भाग व्यापला असल्याचे भारतीय हवामान विभागाने जाहीर केले. हवामानशास्त्राच्या निकषांनुसार मोसमी पाऊस महाराष्ट्रभर पोहोचला असला, तरी समुद्रातून बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग कमी असल्याने पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली असतानाच पावसाच्या आगमनाबाबत संकेत मिळू लागले आहेत. येत्या रविवारपासून (१९ जून) दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही भागांत पाऊस हळूहळू जोर धरणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
मोसमी पावसाने १० जूनला तळकोकणातून महाराष्ट्रात प्रवेश केला. बहुतांश वेळेला प्रतिकूल स्थितीतही त्याने पाच दिवसांचा प्रवास करून गुरुवारी महाराष्ट्राच्या बहुतांश भाग व्यापला आहे. मात्र, मोसमी पाऊस दाखल होऊनही तो बरसत नसल्याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मोसमी पाऊस महाराष्ट्रात दाखल झाल्याच्या कालावधीपासून अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे मोसमी पाऊस दाखल झालेल्या भागात या कालावधीत मोठा पाऊस झालेला नाही. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यात सरासरीच्या तुलनेत ५६ टक्के पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या आणि राज्यातील पाणीसाठ्याबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यातील धरणांत २२ टक्क्यांच्या आसपास पाणीसाठा आहे.
जून महिन्यामध्ये राज्यात पावसाचा टक्का कमी राहणार असल्याचे पूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, सध्या काही भागांत एकदमच पाऊस गायब असल्याने चिंता आहे. मात्र, १९ जूनपासून काही भागांत हळूहळू पाऊस जोर धरणार आहे. अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर द्रोणीय स्थिती, तर गुजरातपासून मध्य महाराष्ट्रापर्यंत चक्रिय वारे निर्माण होणार असल्याने समुद्रातून बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग काही प्रमाणात वाढून पावसाला पोषक वातावरण तयार होणार आहे.
अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग काही प्रमाणात वाढणार असल्याने १९ जूनपासून प्रामुख्याने दक्षिण कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरीत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड, पालघर, ठाणे, मुंबई आदी भागातही २६ जूनपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे आदी जिल्ह्यांच्या घाट विभागातही पाऊस जोर धरण्याचा अंदाज आहे. पुढील पाच दिवस विदर्भ आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

