थॉमस एल. फ्रीडमन यांचा कॉलम:युद्धाचा शेवट केवळ लढाईच्या आघाडीवरून ठरू शकत नाही

मध्यपूर्वेतील युद्धे समजून घेण्यासाठी एकाच वेळी अनेक पैलूंवर लक्ष द्यावे लागते. यातील गुंतागुंतीमध्ये धर्म, तेल, टोळीगत राजकारण आणि महासत्तांची कूटनीती एकमेकांत गुंफलेली असते. तेहरानमधील धर्मसत्ता हटवण्याचा हा प्रयत्न यशस्वी व्हावा, असे मला वाटते. हे असे शासन आहे जे आपल्याच लोकांना चिरडते, शेजाऱ्यांना अस्थिर करते आणि एका प्राचीन संस्कृतीला आतून पोखरून काढले आहे. मध्यपूर्वेला अधिक उदार आणि सर्वसमावेशक दिशेने वळवण्यासाठी यापेक्षा मोठी घटना क्वचितच दुसरी कोणती असू शकेल - अट अशी की, तेहरानमध्ये असे नेतृत्व यावे जे इराणी जनतेला त्यांच्या भविष्यासाठी खरी संधी देईल. परंतु हे सोपे नसेल. या राजवटीची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत व ती केवळ हवाई हल्ल्यांनी कोसळणारी नाहीत. इस्रायल दोन वर्षांहून अधिक काळ चाललेल्या भीषण हवाई आणि जमिनीवरील लढाईनंतरही गाझातील हमासला संपवू शकला नाही. हमास तर अगदी त्यांच्या शेजारी आहे. तरीही, अमेरिका-इस्रायलचा हा हल्ला इराणी जनतेच्या त्या आंदोलनात बदलला नाही ज्याचे आवाहन ट्रम्प यांनी केले आहे,पण याचे काही अनपेक्षित सकारात्मक परिणाम नक्कीच होऊ शकतात. उदाहरणार्थ, असा ‘इस्लामिक रिपब्लिक 2.0’, जो आपल्या नागरिकांसाठी आणि शेजाऱ्यांसाठी कमी आक्रमक असेल. पण तितकीच शक्यता हीदेखील आहे की याचे धोकादायक परिणाम होतील - जसे की इराणचे एक भौगोलिक घटक म्हणून विखंडन. या युद्धाचा अंत केवळ लढाईच्या आघाडीवरून ठरणार नाही. तेल आणि आर्थिक बाजारपेठ देखील तितकीच निर्णायक असेल. इराण आधीच आर्थिक विनाशाच्या उंबरठ्यावर आहे. त्यांच्या चलनाची अवस्था बिकट आहे. रशियाकडून गॅस आयात कमी केल्यानंतर युरोप आता पर्शियन आखातातून येणाऱ्या एलएनजीवर अधिक अवलंबून आहे. ऊर्जेच्या किमतीत होणाऱ्या तीव्र वाढीमुळे महागाई वाढेल आणि यामुळे ट्रम्प यांचे समर्थक नाराज होऊ शकतात - ज्यांच्यापैकी अनेक जण मध्यपूर्वेतील आणखी एका युद्धात अडकण्याच्या विरोधात आहेत. बरेच शक्तिशाली लोक हेच इच्छितात की हे युद्ध मर्यादित राहावे. हेच घटक ठरवतील की ट्रम्प आणि तेहरान यांच्यातील चर्चा कधी पुढे सरकेल. इराणमध्ये लोकशाही आणि कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्याच्या नावाखाली चाललेल्या या युद्धाला आपण अमेरिका आणि इस्रायलमधील लोकशाही संस्थांवर असलेल्या धोक्यांवरून लक्ष भरकटवण्याचे साधन बनू देऊ शकत नाही. ट्रम्प तेहरानमधील लोकशाही मूल्यांबद्दल बोलतात, त्याच वेळी त्यांच्या प्रशासनाचे देशांतर्गत धोरण प्रश्नांच्या घेऱ्यात आहे. इस्रायलमधील परिस्थितीही कमी गुंतागुंतीची नाही. अशात, हे युद्ध नेतान्याहू यांना या वर्षी प्रस्तावित निवडणुकीत राजकीय आघाडी मिळवून देईल का? इराणने प्रॉक्सी नेटवर्क उभे करून सीरिया, लेबनॉन, इराक आणि येमेन या चार अरब देशांवर आपला प्रभाव निर्माण केला आणि या सर्वांत उदारमतवाद्यांना कमकुवत करण्यासाठी सांप्रदायिक विभाजनाला खतपाणी घातले. गेल्या दोन वर्षांत इस्रायल आणि अमेरिकेच्या सततच्या दबावाने तेहरानची पकड कमकुवत केली आहे. याचा परिणाम असा की सीरियात इराण-समर्थित असद राजवट कोसळली व लेबनॉन हिजबुल्लाच्या पकडीतून बाहेर पडू शकला. हेही लक्षात घेतले पाहिजे की इराणी समाज नैसर्गिकरीत्या पश्चिमेकडे सर्वाधिक सकारात्मक कल असलेल्या समाजांपैकी एक राहिला आहे. जर त्या प्रवृत्तीला उभारी मिळू दिली आणि ती इराणी शासनाने पसरवलेल्या फुटीरतावादी कट्टरपंथी इस्लामी अजेंड्याची जागा घेत असेल, तर मध्यपूर्वेसाठी अधिक सर्वसमावेशक भविष्याची शक्यता निर्माण होऊ शकते. इराणमधील शासनविरोधी निदर्शनांमधील एक लोकप्रिय घोषणा उगीचच नाही: “गाझा नाही, लेबनॉन नाही, इराणसाठी माझा जीव.”(द न्यूयॉर्क टाइम्सवरून) तेल आणि बाजारपेठ निर्णायक ठरतीलमध्यपूर्वेतील हुकूमशाहीचा शेवट नेहमीच लोकशाहीत होतो असे नाही. अनेकदा ती अराजकता असते. या क्षेत्रातील हुकूमशाही व्यवस्था संपतात, तेव्हा त्या एकतर आतून तुटतात (जसे लिबिया) किंवा त्या स्फोटक पद्धतीने विखुरल्या जातात (जसे सीरिया).

This post was originally published on this site.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *