महान मॅनेजमेंट तज्ज्ञ पीटर ड्रकर यांनी म्हटले होते की, ‘कल्चर ईट्स स्ट्रॅटेजी फॉर ब्रेकफास्ट.’ म्हणजेच, कोणत्याही संस्थेची संस्कृती—तिथल्या मान्यता, वर्तन आणि मूल्ये—ही कोणत्याही धोरणात्मक योजनेपेक्षा जास्त शक्तिशाली असते. जर संस्कृती विषारी किंवा असंतुलित असेल, तर ती चांगल्यातली चांगली रणनीतीही अपयशी ठरवते. कारण कर्मचारी त्यात प्रभावीपणे काम करू शकत नाहीत. जर तुमच्याकडे ड्रकर यांचे पुस्तक वाचायला वेळ नसेल, तर अलीकडेच झालेला टी-20 क्रिकेट सामना तुम्हाला ही गोष्ट तितक्याच वेगाने समजावून सांगेल. चांगली संस्कृती कशी चमत्कार घडवू शकते, हे रविवारच्या सामन्यावरून समजून घेऊया. लक्षात ठेवा, प्रतिभा सामना जिंकून देते, पण संस्कृती चॅम्पियनशिप जिंकून देते. 1. जेव्हा सर्वस्व पणाला लागते, तेव्हा कर्मचाऱ्यांना कामगिरी करावीच लागते: गेल्या तीन बाद फेरीच्या (नॉकआउट) सामन्यांमधील संजू सॅमसनची धावसंख्या पाहा. वेस्ट इंडिजविरुद्ध 50 चेंडूत नाबाद 97, इंग्लंडविरुद्ध 42 चेंडूत 89 आणि न्यूझीलंडविरुद्ध 46 चेंडूत 89 धावा. तिन्ही सामन्यांत तो खडकासारखा उभा राहिला आणि अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली. अभिषेक शर्माने केवळ 18 चेंडूत अर्धशतकच झळकावले नाही तर एक बळीही घेतला. ईशान किशन आणि शिवम दुबे यांनीही असेच योगदान दिले. गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने चार आणि अक्षर पटेलने तीन बळी घेत सर्वोत्तम कामगिरी केली. हे सर्व घडू शकले कारण या सर्वांना माहित होते की, प्रतिभेमुळे ते क्रीझपर्यंत पोहोचू शकतात, पण त्यांचा संयमच ते तिथे टिकणार की नाही हे ठरवेल. अगदी तसेच, आपण आपल्या कौशल्याने नोकरी तर मिळवतो, पण तिथली संस्कृती आणि आपली वैयक्तिक मानसिकता आपण यशस्वी होणार की नाही हे ठरवते.
2. आश्वासक संस्कृतीतच प्रतिभा बहरते: सॅमसनने कबूल केले की, “मला वरिष्ठ खेळाडूंकडून, विशेषत ः सचिन तेंडुलकर सरांकडून खूप मार्गदर्शन आणि सल्ले मिळाले.” फायनलच्या दिवशीही सचिनने सॅमसनला फोन करून तो कसा अनुभवत आहे, याची विचारपूस केली. ‘मेंटर’ (मार्गदर्शक) हे केवळ एक पद नसते; जर तुम्हाला तुमची कंपनी मोठे यश मिळवेल असे वाटत असेल, तर मेंटर म्हणून कर्मचाऱ्याचा स्वीकार एखाद्या मुलाप्रमाणे करावा लागतो. त्याच्या चुका माफ करणे, त्याचे धाडस वाढवणे आणि त्याला उत्तम कामगिरीसाठी प्रेरित करणे आवश्यक असते. अभिषेक आणि ईशान हीदेखील अशाच मेंटरशिपची उदाहरणे आहेत.
3. प्रगतीची भूक: अंतिम सामने थरारक मानले जातात, पण रविवारचा सामना एकतर्फी झाला. का? कारण भारतीय संघाचा उत्साह न्यूझीलंडच्या सहनशक्तीच्या पलीकडे होता. भारतीय खेळाडूंना माहित होते की न्यूझीलंड पूर्ण 20 षटके खेळले तरी 200 धावांपर्यंत पोहोचणार नाही, तरीही त्यांनी त्यांना 19 षटकांतच गुंडाळले. दुसऱ्या डावात स्पष्ट दिसत होते की, भारतीय संघाला लवकरात लवकर विश्वचषक उंचावायचा होता, मग त्यात थोडा धोका का असेना.
4. संस्कृती अंधश्रद्धेला हरवते: आपल्यापैकी अनेकांना जशा अंधश्रद्धा असतात, तसेच अहमदाबादच्या मैदानाशीही ‘पनौती’सारखे कलंक जोडले गेले होते. या मैदानाबाबत सोशल मीडियावर मीम्स व्हायरल झाले होते, कारण या मैदानाच्या काही दुःखद आठवणी होत्या. अशा परिस्थितीत दडपण केवळ जिंकण्याचेच नव्हते, तर त्या जुन्या आठवणी पुसून नवीन आठवणी निर्माण करण्याचेही होते. कोणी आपल्या कर्णधाराला अंधश्रद्धाळू म्हणू शकते—आठवा जेव्हा सूर्यकुमार यादवने खेळपट्टीची माती कपाळाला लावली होती? पण ती अंधश्रद्धा नव्हती, तर ‘हे मैदान आमचे आहे’ अशी त्याने स्वतःला आणि संघाला दिलेली ती एक ग्वाही होती.
‘दैनिक भास्कर’ समूहामधील आमची संस्कृतीदेखील यशाच्या इतिहासाला वारसा बनवण्याची आणि प्रत्येक विभाग अव्वल स्थानी राहील याची खात्री करण्याची राहिली आहे.
फंडा असा की - जर तुम्ही एखाद्या संस्कृतीचा स्वीकार केला आणि त्यावर विश्वास ठेवला, तर तीच संस्कृती अंधश्रद्धेला ताकदीत, मीम्सना आठवणीत आणि वेदनेला अभिमानात बदलू शकते. यशासाठी व्यवस्थापनाला हीच संस्कृती कंपनीच्या प्रत्येक व्यक्तीमध्ये रुजवावी लागते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- Pune Traffic : वेगात गाडी चालवली तर थेट ट्रॅप! पोलिसांची नवी मोहीम, प्रथमच लेझर स्पीड कॅमेऱ्यांचा वापर
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:उत्साहाचे दुःखात रूपांतर करणाऱ्या मनावर काम करावे
- मनोज जोशी यांचा कॉलम:इराणविरुद्धच्या युद्धामागे फक्त भू-राजकीय घटक नव्हे
- बोरिया मजुमदार यांचा कॉलम:टीमचा विश्वास खेळाडूच्या कामगिरीस उंचावू शकतो
महाराष्ट्र
- मनोज जोशी यांचा कॉलम:इराणविरुद्धच्या युद्धामागे फक्त भू-राजकीय घटक नव्हे
- बोरिया मजुमदार यांचा कॉलम:टीमचा विश्वास खेळाडूच्या कामगिरीस उंचावू शकतो
- आर्थिक साक्षरता:महिलांमध्ये जोखीम ओळखण्याची क्षमता चांगली; युद्धकाळ गुंतवणुकची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती
- शरण शरण एकनाथा: संत एकनाथ महाराज म्हणजे समाजप्रबोधनाची अखंड ज्योत; वाचा, नाथ षष्ठीनिमित्त विशेष लेख...!
गुन्हा
- मनोज जोशी यांचा कॉलम:इराणविरुद्धच्या युद्धामागे फक्त भू-राजकीय घटक नव्हे
- बोरिया मजुमदार यांचा कॉलम:टीमचा विश्वास खेळाडूच्या कामगिरीस उंचावू शकतो
- आर्थिक साक्षरता:महिलांमध्ये जोखीम ओळखण्याची क्षमता चांगली; युद्धकाळ गुंतवणुकची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती
- शरण शरण एकनाथा: संत एकनाथ महाराज म्हणजे समाजप्रबोधनाची अखंड ज्योत; वाचा, नाथ षष्ठीनिमित्त विशेष लेख...!
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- Health त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी






















Subscribe to my channel

