आशुतोष वार्ष्णेय यांचा कॉलम:इराणमधील युद्ध कधी अन् कसे बरे संपेल?‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎इराणमध्ये सुरू असलेले युद्ध केव्हा आणि कसे संपेल, हे‎युद्ध सुरू करणाऱ्या अमेरिका आणि इस्रायलच्या‎उद्दिष्टांवर अवलंबून आहे. काही प्रमाणात इराणच्या‎प्रतिसादावर आणि त्याच्या लष्करी व राजकीय‎क्षमतांवरही अवलंबून आहे. इस्रायलची युद्धाची उद्दिष्ट्ये‎स्पष्ट आणि सुसंगत असली तरी अमेरिकेची भूमिका‎अनेक विविध घटकांमध्ये गुंतलेली आहे.‎ इराणचे धार्मिक सरकार आपल्या नागरिकांविषयी अत्यंत‎दडपशाही करणारे व बाह्य पातळीवर विशेषतः‎इस्रायलविरुद्ध आक्रमक राहिले आहे. पहिला मुद्दा‎इस्रायलसाठी प्राथमिक चिंतेचा विषय नाही; दुसरा आहे.‎इराणची राजकीय व्यवस्था कोसळावी किंवा किमान‎त्याची लष्करी ताकद आणि त्याच्या मित्र‎गटांची—विशेषतः लेबॉनमधील हिजबुल्लाह आणि‎गाझामधील हमासची—शक्ती लक्षणीयरीत्या कमी‎व्हावी, असे इस्रायलला वाटते. 7 ऑक्टोबर 2023 नंतर‎दोन्ही गटांना मोठे नुकसान झाले होते आणि काहींना भीती‎होती की ते सावरू शकणार नाहीत. परंतु आता हे स्पष्ट‎झाले आहे की लेबनॉनमधील हिजबुल्लाह कमकुवत‎झाला असला तरी पुन्हा सक्रिय झाला आहे. इराणबद्दल‎इस्रायलची भूमिका पॅलेस्टिनींबद्दलच्या भूमिकेसारखी‎नाही. केवळ इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू‎आणि उजव्या विचारसरणीच्या नेत्यांसाठीच नव्हे तर‎इस्रायली समाजाच्या मोठ्या वर्गासाठीही 7 ऑक्टोबर‎2023 नंतर गाझामधील पॅलेस्टिनींना ‘माणसापेक्षा दुय्यम ''‎मानले गेले. म्हणूनच त्यांचा हिंसक विनाश न्याय्य ठरवला‎गेला. इतिहास आणि सिद्धांत दर्शवतात की अशा‎विचारसरणीमुळे सामूहिक हत्या आणि नरसंहार होऊ ‎‎शकतो. इराणच्या बाबतीत इस्रायलविषयीच्या चर्चांमध्ये ‎‎अनेकदा सरकार व समाज यांच्यात फरक केला जातो. ‎‎इराणी सरकारला दुष्ट म्हणून चित्रित केले जाते . त्याच्या ‎‎उच्चाटनाची मागणी केली जाते तर इराणी समाज—‎1979 च्या क्रांतीपूर्वी इस्रायलचा मित्र मानला जात ‎‎होता—एका प्राचीन संस्कृतीचा भाग मानला जातो.‎त्यामुळे गाझामध्ये अवलंबलेली रणनीती इराणसाठी लागू ‎‎केली जाऊ शकत नाही. इराणमधील इस्रायलचे प्राथमिक ‎‎उद्दिष्ट सरकार बदलणे असेल. समाज नष्ट करणे नव्हे. ‎‎अमेरिकेने इराणवर हल्ला करण्यासाठी अनेक कारणे‎दिली आहेत. तशी अशी : राजकीय व्यवस्था बदलणे; ‎‎इराणची लष्करी क्षमता, विशेषतः क्षेपणास्त्रे बनवण्याची ‎‎आणि प्रक्षेपित करण्याची क्षमता नष्ट करणे; आणि त्याचे ‎‎युरेनियम संवर्धन रोखणे. इराणला अण्वस्त्रे‎मिळवण्यापासून रोखणे; अरब जगतातील इराणच्या मित्र ‎‎राष्ट्रांना संपवणे; शोषित नागरिकांची सुटका करणे; आणि ‎‎इराणने अमेरिकेवर किंवा तिच्या प्रादेशिक हितसंबंधांवर ‎‎हल्ला करण्यापूर्वीच त्यावर जोरदार प्रहार करणे. या‎असंख्य कारणांनंतरही, अनेकांचा असा युक्तिवाद आहे‎की हे खरे तर इस्रायलचे युद्ध आहे आणि अमेरिका केवळ ‎‎त्याचा भागीदार आहे. तरीही, इतकी वेगवेगळी कारणे ‎‎असण्याची समस्या सैद्धांतिकदृष्ट्या सोडवली जाऊ‎शकते. असे म्हणता येईल की सरकार बदलणे हे‎अमेरिकेचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. इतर उद्दिष्टे त्याच्याशी‎जोडलेली आहेत. प्राथमिक उद्दिष्ट साध्य झाले तर इतर‎उद्दिष्टे आपोआप पूर्ण होतील. दुसऱ्या शब्दांत सरकार‎बदलले तर अण्वस्त्रांच्या योजना सोडून दिल्या जातील.‎क्षेपणास्त्र उत्पादन कमी होईल. मित्र गट कमकुवत होतील‎आणि नागरिकांवरील दडपशाही देखील कमी होईल. पण‎समस्या ही आहे की सरकार बदलणे शक्य होणार नाही‎किंवा त्याला खूप वेळ लागू शकतो. नेत्यांची हत्या करणे‎म्हणजे राजकीय व्यवस्था बदलणे नव्हे विशेषतः मजबूत‎संस्था असलेल्या देशात. 1979 च्या क्रांतीनंतर इराणने‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎संविधानाद्वारे एक धर्मसत्ताक व्यवस्था स्थापित केली.‎त्यात धर्मगुरूंना देशावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार‎आहे. निवडून आलेल्या सरकारपेक्षा त्यांच्याकडे अधिक‎सत्ता आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, क्रांतीचे रक्षण‎करण्यासाठी एक मोठी संघटना तयार करण्यात आली‎होती—इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स. बाह्य‎शक्तीद्वारे सध्याचे नेतृत्व हटवले गेले तरी स्थापित‎कार्यपद्धतींनुसार नवीन नेतृत्व उदयास येऊ शकते. किमान‎नजीकच्या भविष्यात बाह्य दबावामुळे संपूर्ण राजवट‎कोसळण्याची शक्यता कमी वाटते. शिवाय, इराण‎राजकीय व्यवस्था बदलण्याच्या प्रयत्नांचा खर्च सहजपणे‎आणि लक्षणीयरीत्या वाढवू शकतो. क्षेपणास्त्रे रोखणाऱ्या‎हवाई संरक्षण प्रणाली खूप महाग असतात. जितकी जास्त‎क्षेपणास्त्रे डागली जातात तितका क्षेपणास्त्र संरक्षणाचा‎खर्च वाढतो व त्या कायमस्वरूपी टिकू शकत नाहीत. युद्ध‎लांबले तर हा खर्च कमी नसेल. काही क्षेपणास्त्रे तर हवाई‎संरक्षण भेदून लक्ष्यांपर्यंत पोहोचतील. इराण आखाती‎देशांमध्ये आधीच असे करत आहे. यामुळे त्यांच्या‎अर्थव्यवस्थांचे नुकसान होत आहे. हे नुकसान आणखी‎मोठे असू शकते. दुसरे म्हणजे ड्रोनने युद्धांचे स्वरूप‎बदलले आहे. क्षेपणास्त्रांपेक्षा त्यांचे उत्पादन व प्रक्षेपण‎खूपच स्वस्त आहे. युक्रेनने दाखवून दिल्याप्रमाणे दोन्ही‎देशांच्या लष्करी सामर्थ्यात मोठी तफावत असूनही ड्रोन‎दीर्घकाळ युद्ध चालू ठेवू शकतात. क्षेपणास्त्र प्रक्षेपक‎आणि उत्पादन सुविधांवर हल्ला झाला—जसे की‎इस्रायली आणि अमेरिकन लष्करी कारवायांमध्ये दिसून‎येत आहे—तर संयुक्त अरब अमिराती आणि‎कतारसारख्या अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर ड्रोन हल्ले‎बचावासाठी वापरले जाऊ शकतात. ड्रोन उत्पादन क्षमता‎पूर्णपणे कशी नष्ट करायची हे कोणालाही माहीत नाही.‎ तिसरे म्हणजे इराण जगातील केवळ 5% तेलाचे उत्पादन‎करतो. परंतु जगातील 20% तेल आणि वायूचा पुरवठा‎होर्मुझ खाडीद्वारे करतो. ऊर्जा तज्ज्ञ डॅनियल येरगिन‎यांच्या मते, जग इतिहासातील तेल उत्पादनातील सर्वात‎मोठ्या व्यत्ययाचा आणि जागतिक गॅस बाजाराला‎बसणाऱ्या मोठ्या धक्क्याचा सामना करत आहे. ड्रोनचा‎वापर आणि होर्मुझवरील नियंत्रणाच्या माध्यमातून युद्धाचा‎खर्च वाढवणे हे इराणच्या हिताचे ठरेल, आणि तसे‎करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. व्हेनेझुएलासारखा‎स्वस्त विजय येथे शक्य नाही.‎ (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत)‎ इराण या युद्धाची किंमत‎वाढवायला तयार ....‎ड्रोनचा वापर आणि होर्मुझ समुद्रावरील‎नियंत्रणाच्या माध्यमातून युद्धाची किंमत‎वाढवत राहणे हे इराणच्या हिताचे ठरेल.‎तसे करण्याची क्षमताही त्याच्याकडे आहे.‎व्हेनेझुएलासारखा स्वस्त विजय‎इराणमध्ये शक्य नाही. इराणमध्ये सत्ता‎हवेतून बदलता येऊ शकत नाही.‎

This post was originally published on this site.



विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *