Chandrakant Patil : ‘मी मतांची भिक मागायला आलोय,’ : चंद्रकांत पाटील

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुमच्या मताची भीक मागायला मी आलोय, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी (Chandrakant Patil) पुण्यात बोलताना केलं आहे.

Chandrakant Patil : "ताकाला जाऊन भांड लपवायची सवय मला नाही. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुमच्या मताची भीक मागायला मी आलोय, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात बोलताना केलं आहे. पुणे महानगरपालिका निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे राजकारण तापताना दिसत आहे. प्रत्येक पक्ष कामाला लागलेले पाहायला मिळत आहेत. अशातच चंद्रकांत पाटील यांच हे वक्तव्य चर्चेत आलं आहे. पुणे महापालिकेत नव्याने 34 गावे समाविष्ट झाल्यामुळे पुणे महानगरपालिकेची लोकसंख्या तब्बल 70 लाखांवर गेली आहे. असं असताना प्रगती कशी होणार? असा प्रश्न उपस्थित करत पुण्यामध्ये दोन महानगरपालिका व्हायला पाहिजेत, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना केली आहे. "पुणे महानगरपालिका स्थापन झाल्यापासून भाजपची पहिल्यांदाच सत्ता आली आहे. गेल्या पाच वर्षात भाजपकडून एकही रूपयांचा भ्रष्टाचार झाला नाही. भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले असले तरी त्यातील एकही आरोप सिद्ध झाला नाही. पुणेकरांसाठी भाजपने मेट्रो आणली. शहरातील रस्ते व्यवस्थीत करण्यात आले आहेत. पाण्याचा प्रश्न सोडवला आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. दरम्यान, पुणे महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने कसून तयारी केली आहे. ही निवडणूक भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात लढणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले आहे. या निवडणुकीला अजून दोन महिने बाकी आहेत. परंतु, भाजपने आतापासूनच रणशिंग फुंकल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता सर्वच पक्ष मैदानात उतरतील अशी शक्यता आहे.  


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply