नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा धडक मोर्चा, देवेंद्र फडणवीसांसह भाजप नेत्यांना ताब्यात घेऊन सोडलं

मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी मुंबईत मोर्चा काढण्यात आला. मेट्रो सिनेमाजवळ मोर्चा आल्यानंतर पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांना ताब्यात घेऊन सोडले.

मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी मुंबईत मोर्चा काढणाऱ्या भाजप नेत्यांनी आज ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला. आझाद मैदान ते मेट्रो सिनेमापर्यंत हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोर्चा काढून भाजपनं आज मुंबईत शक्तिप्रदर्शन केलं. मोर्चा सुरु होण्यापूर्वी आझाद मैदानात भाजपच्या नेत्यांनी ठाकरे सरकार आणि आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. नवाब मलिक यांचा राजीनामा घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला. मेट्रो सिनेमाजवळ मोर्चा आल्यानंतर पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांना ताब्यात घेऊन त्यांना यलो गेट पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले होते. दरम्यान पोलिसांनी फडणवीस यांना सोडलं असून इतर नेत्यांनाही सुटका करण्यात येत आहे. आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा असा मोर्चा निघालेला असताना पोलिसांनी फडणवीस यांच्यासह चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, प्रसाद लाड, किरीट सोमय्या, निलेश राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांना पोलिसांनी सोडले असून इतर नेत्यांचीही सुटका करण्यात येणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब फोडला. या आरोपांना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील उद्या उत्तर देणार आहेत. उद्याच्या उत्तराने दूध का दूध आणि पानी का पानी होणार असा इशारा गृहमंत्र्यांनी दिलाय. फडणवीस यांच्या विनंतीमुळे आज उत्तर दिलं नसल्याचंही गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलंय हा संघर्ष देशद्रोह्यांविरोधात आहे. दाऊदच्या गुर्ग्यांविरोधात संघर्ष आहे. भारतमातेसाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांच्यासाठी हा संघर्ष आहे. हे छत्रपतींचे मावळे आहेत, ते झुकणार नाहीत, वाकणार नाहीत, थकणार नाहीत, बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत व्यवहार करुन जेलमध्ये गेलेल्या नवाब मलिकांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. ही मागणी आमची केवळ राजकीय मागणी नाही. रोज घटना घडतात, पण रोज आम्ही राजीनामा मागत नाही. पण ही घटना बघितली तर लाजिरवाणी आहे. बॉम्बस्फोटातील आरोपी शहावली खान याकूब मेमनसोबत बसून बॉम्बस्फोटाचा कट केला, बॉम्बस्फोट कसा घडवायचा, स्कूटरमध्ये ठेवून बॉम्बस्फोट केले. दुसरा सलीम पटेल दाऊदची बहिण हसिना पारकर या दोघांनी मिळून हे कुंभाड रचलं. या हरामखोरांनी जमीन विकली, कोणाला विकली नवाब मलिकांना. मुंबईत उकिरड्याची जागाही 25 रुपये चौरस फुटाने मिळत नाही. या हरामखोरांसोबत व्यवहार करताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही. जे मुंबईकर ज्यांचे बॉम्बस्फोटत चिंधड्या उडाल्या, ज्यांचे पती मेले, बाप मेले, घरदार उद्ध्वस्त झाले त्यांचे अश्रू दिसले नाहीत का? पैशासाठी इतके आंधळे झालात का? असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply