**रोहित पवारांचा खळबळजनक गौप्यस्फोट: "पत्रकार परिषदांमुळे हादरल्याने मॅनेज करण्याचा प्रयत्न का? आमच्या जवळच्या व्यक्तीला कोणाचा फोन आला?"**
**मुंबई:** राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज पुन्हा एकदा दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन तपास यंत्रणांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अपघाताच्या तपासातील त्रुटींवर बोट ठेवतानाच, त्यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केले. एका खासगी विमान कंपनीच्या मालकाने आपल्या जवळच्या व्यक्तीला फोन करून, तपासावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, तपासाला जाणूनबुजून दिरंगाई केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
**रोहित पवारांचा व्ही.के. सिंगवर गंभीर आरोप**
रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, "व्हीएसआर (VSR) या कंपनीचे मालक व्ही.के. सिंग यांनी आमच्या दीपक बोरकर नावाच्या व्यक्तीला फोन केला होता. त्यांना वाटले की बोरकर हे पत्रकार आहेत." या फोनवरील संभाषणात व्ही.के. सिंग यांनी अनेक धक्कादायक दावे केल्याचे पवार म्हणाले. "एआयबी (Aircraft Accident Investigation Bureau) ने मला क्लिअरन्स दिला आहे. तुम्हाला अधिकची माहिती कशाला हवी?" असे व्ही.के. सिंग बोलल्याचे पवार यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, "खालपासून वरपर्यंत आमची ओळख आहे आणि कोणीच आमचं काही बिघडवू शकत नाही, असं व्ही.के. सिंग बोरकरला सांगत होते."
या संदर्भात, व्ही.के. सिंग यांनी आपल्या कंपनीची विमाने अजूनही उडत असून, सरकारही ती वापरत आहे, तर तुम्हाला काय अडचण आहे, असा सवाल केल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. "हा व्हॉट्सअॅप कॉल होता. तुमच्याकडे व्हॉट्सअॅप हॅकिंगची यंत्रणा असेल तर ती वापरून, हा कॉल कुणाला आणि सहा महिने तो कुणाशी बोलत होता, ते काढा. व्ही.के. सिंग महाराष्ट्र सदनमध्ये कुणाला भेटला होता, तेही समोर आणा," अशी मागणी रोहित पवार यांनी केली. अजितदादांसारखा मोठा नेता गेल्यानंतरही अशा प्रकारे हिंमत कुठून येते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
**तपासातील दिरंगाई आणि सीबीआय चौकशीची मागणी**
रोहित पवार यांनी तपासाच्या प्रगतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. "आम्ही एफआयआर (FIR) नोंदवण्याची मागणी करतो आहोत. पुरावे देऊनही एआयबी चांगला तपास करेल, अशी आम्हाला आशा होती, पण कोणाचीही दखल घेतली जात नाही," असे ते म्हणाले. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या प्रकरणाचा दाखला देत त्यांनी म्हटले की, "सुशांत सिंगच्या बाबतीत बिहार सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यावर दोन दिवसांत सीबीआयने प्रकरण हाती घेतले होते. अजितदादा जाऊन महिना झाला, त्यांच्या पक्षाने मुख्यमंत्र्यांकडे सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्याला १४ दिवस होऊनही चौकशी केली जात नाही, याचा अर्थ काय?" असा थेट प्रश्न त्यांनी विचारला.
**डीजीसीए आणि खाजगी विमान कंपन्यांवर संशयाचे बोट**
पवार यांनी तपास यंत्रणांवर दबाव आणला जात असल्याचा गंभीर आरोप केला. "तुमचा पैसा वैध मार्गाने आला आहे की हवालामार्गे, याच्याशी आम्हाला घेणेदेणे नाही. फक्त चौकशी व्यवस्थित झाली पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे," असे त्यांनी स्पष्ट केले. ९० लाख शेअर्स असलेल्या विस्ता (Vista) कंपनीचा संदर्भ देत त्यांनी या प्रकरणाचे धागेदोरे उलगडण्याचा प्रयत्न केला. "विस्ता सेलमध्ये अंबुजा (Ambuja) आणि लंबोदर (Lambodar) यांची गुंतवणूक आहे. महेंद्रकुमार गोएंका हे या कंपन्यांमध्ये संचालक आहेत," असे त्यांनी सांगितले.
या प्रकरणात भाजपचे मध्य प्रदेशातील आमदार संजय पाठक यांच्या सहभागाकडेही त्यांनी लक्ष वेधले. "संजय पाठक नावाचे एक व्यक्ती या कंपन्यांमध्ये आहेत. ते भाजपचे मध्य प्रदेशचे आमदार आहेत आणि ते अतिशय श्रीमंत आहेत. या कंपनीत संजय पाठक यांचा मुलगाही संचालक आहे," अशी माहिती पवार यांनी दिली. एका आमदाराने खासगी विमान कसे विकत घेतले आणि डीजीसीए (Directorate General of Civil Aviation) या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. "दादांची चौकशी बाजूला राहिली, संजय पाठकने न्यायाधीशांनाही मॅनेज करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे डीजीसीएला मॅनेज करायला त्यांना किती वेळ लागेल?" असा सवाल करत त्यांनी तपास यंत्रणांवर दबाव असल्याचा अप्रत्यक्षपणे आरोप केला. या सर्व गौप्यस्फोटांमुळे अजित पवार विमान अपघात प्रकरणातील गुंतागुंत आणखी वाढली असून, आगामी काळात यावर काय राजकीय आणि प्रशासकीय पडसाद उमटतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
हे पण वाचा-
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

The Politics Lab | बातमीमागचं राजकारण, पडद्यामागची कारणं | Pune News
शिवसेना (UBT) खासदार अरविंद सावंत यांची पत्रकार परिषद #live
भ्रमंती – Official Logo Reveal | Pune News Original Travel Series #travel #video
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

