Ukraine : युद्ध जैविक शस्त्रांनी लढलं जाणार? बायडन यांचा गंभीर इशारा

वॉशिंग्टन : रशियानं युक्रेनवर केलेल्या आक्रमणाला आता लवकरच महिना पूर्ण होईल, पण युद्ध अद्याप थांबवण्याची चिन्हं दिसत नाहीत. दरम्यान, या युद्धात रशिया केमिकल आणि जैविक शस्त्रास्त्रांचा वापर करु शकतं, तसा स्पष्ट इशाराच रशियानं दिल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलं आहे "आता पुतीन नव्या खोट्या ध्वजांबद्दल बोलत आहेत ज्यामध्ये ते असं ठासून सांगत आहेत की आमच्याकडे आणि युरोपमध्ये जैविक आणि रासायनिक शस्त्रे आहेत. त्यांचं हे म्हणणं खरं नाही," असं बायडन यांनी रॉयटर्सशी बोलताना म्हटलं. पण पुतीन यांचं हे विधान म्हणजेच स्पष्ट इशाला आहे की, ते ही दोन्ही शस्त्र वापरण्याचा विचार करत आहेत"  


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply