अंबानी-अडाणींसह दिग्गजांच्या उपस्थितीत योगी घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील शपथविधी समारंभ भव्य व अविस्मरणीय होण्यासाठी भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री, भाजपसाशित राज्यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री, उद्योजक, साधू-महंतांना निमंत्रण दिलेच आहे. शिवाय बॉलिवूडमधील अभिनेते-अभिनेत्रींच्या उपस्थितीने या समारंभाला ‘चारचाँद’ लागणार आहेत.

याशपथविधीला रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि इतर 60 उद्योगपतींनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. या सोहळ्यासाठी काश्मिरी पंडितांच्या प्रश्नावर नुकताच प्रदर्शित झालेल्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाच्या टीमलाही आमंत्रित करण्यात आले असून, कार्यक्रमाला अभिनेता अनुपम खेर आणि चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यांच्यासोबतच भाजपला नेहमी पाठिंबा देणारे अक्षय कुमार आणि कंगना रणौत यांनाही निमंत्रित करण्यात आलं आहे. तसेच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांच्यासह विरोधी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *