नवी दिल्ली – देशातील पहिल्या हायड्रोजन कारने नितीन गडकरींचा संसदेपर्यंत प्रवास

नवी दिल्ली - ग्रीन हायड्रोजन इंधनावर चालणारी कार आज देशात पहिल्यांदाच धावली आहे. केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या कारमधून संसदेपर्यंत प्रवास केला. ही कार इंधन भरल्यानंतर जवळपास 600 किलोमीटर अंतर पार करू शकते. इंधनाच्या वाढत्या किंमतीमध्ये ग्रीन हायड्रोजन हा सर्वात मोठा पर्याय आहे याचा खर्च प्रति किलोमीटर २ रुपये येईल, असं नितीन गडकरी यावेळी म्हणाले. 

नितीन गडकरी म्हणाले की, ही कार पूर्णपणे पर्यावरणपूरक असून कोणत्याही प्रकारचे प्रदूषण पसरवत नाही. ही कार भारताचे भविष्य असल्याचे ते म्हणाले. परंतु ग्रीन हायड्रोजन कारमुळे अजिबात प्रदूषण होत नाही.

टोयोटा किर्लोस्कर मोटर्सने अलीकडेच त्यांची हायड्रोजन कार टोयोटा मिराई भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. ग्रीन हायड्रोजन इंधनावर चालणारी ही देशातील पहिली कार आहे. जपानी भाषेत 'मिराई' या शब्दाचा अर्थ भविष्य असा होतो.

जगभरात प्रदूषण वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी ग्रीन हायड्रोजन इंधनाचा वापर करण्याचे ठरवले आहे. आज त्यांनी ग्रीन हायड्रोजनवर चालणाऱ्या कारमधून घरापासून ते संसदेतपर्यंत प्रवास केला.

ग्रीन हायड्रोजन म्हणजे पाण्यापासून निघणारं हायड्रोजन. याचा खर्च प्रति किलोमीटर 2 रुपये येईल. देशातील महापालिकेत असणाऱ्या सांडपाण्याच्या समस्येवर उपाय शोधून ग्रीन हायड्रोज तयार करण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे देखील नितीन गडकरी म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply