मुंबई : शरद पवार VVIP कल्चरपासून दूर! विमानतळावर सर्वसामान्यांसारखे रांगेत

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी वयाची ऐंशी वर्ष पार केली आहेत. तरीही त्यांचे झंझावती दौरे तरुणांना लाजवेल, असे असतात. त्यांनी साताऱ्यात भर पावसात घेतलेली सभा सर्वांना माहिती आहे. आता त्यांचा असाच एक साधेपणा समोर आला आहे. त्यांनी व्हिव्हिआयपी रांग सोडून सर्वसामान्यांसोबत विमानात प्रवेश केला. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

शरद पवार आज सकाळीच दिल्ली दौऱ्यावर निघाले होते. त्यासाठी ते मुंबई विमानतळावर गेले. नेहमी व्हिव्हि आयपी व्यक्तींना विमान प्रवासात वेगळ्या रांगेतून प्रवेश दिला जात असतो. पण, युके ९७० मुंबई ते दिल्ली या फ्लाईटमध्ये पॅसेंजर बोर्डींगवेळी शरद पवार सर्वसामान्यांच्या रांगेत उभे दिसले. त्यांच्या मागे पुढे काही सामान्य लोक असल्याचं दिसतंय. त्यांनी व्हिआयपी ट्रिटमेंट न घेता सर्वसामान्यांसारखे रांगेत असल्याचे पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तसेच पवारांचा हा फोटो अनेकांनी ट्विट करत कौतुक केले आहे.

शरद पवार वयाची ऐंशी वर्ष पूर्ण केल्यानंतरही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करतात. पक्षबांधणीसाठी आताही ते झंझावती दौरे करतात. इतकंच नाहीतर महाविकास आघाडी सरकारमधील मोठे प्रश्न देखील शरद पवारच सोडवतात. शरद पवारांनी आतापर्यंत राज्याच्या मुख्यमंत्रिपदापासून तर केंद्रीय मंत्रिपदापर्यंतच्या अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. ते देशातील मोठा चेहरा आहेत. अनेकदा पंतप्रधान पदासाठी त्यांचं नाव घेतलं जातं. देशातील बड्या नेत्यांप्रमाणे पवारांना व्हिव्हिआयपी सुविधा लागू आहेत. पण, त्यांनी या सुविधांचा लाभ न घेता थेट सर्वसामान्यांसोबत रांगेत उभे राहिले. त्यामुळे त्यांच्या फोटोची चांगलीच चर्चा रंगली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply