मुंबई :आमदारांना मोफत घरे देणं योग्य नाही; शरद पवारांचा राज्य सरकारला घरचा आहेर

मुंबई: आमदारांना मोफत घरं देण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय चांगलाच वादग्रस्त ठरला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर टीकेची झोड उठली आहे. या साऱ्या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आपलं मत मांडत महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. शरद पवार यांनी या प्रकारे आमदारांना मोफत घरे देणं योग्य नाही, हा निर्णय चुकीचा असल्याचा त्यांनी निर्वाळा दिला आहे. 'साम टीव्ही'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

केवळ आमदारांसाठी गृहनिर्माण योजना नको. शरद पवार यांनी फक्त आमदारासाठी घर देण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. गृहनिर्माण योजनेमधील घरांमध्ये आमदारांना साठी कोटा ठेवावा, हे योग्य आहे, असं त्यांनी म्हटलंय. मात्र, ते ही त्या घरांची योग्य किंमत घेऊन ही घरे दिली पाहिजेत, असं त्यांनी म्हटलंय. या निर्णयाबाबत शरद पवार पक्षातील मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी स्वत:चं सांगितलं आहे.

राज्यातील आमदारांसाठी मुंबईत मोफत घरे देण्याची घोषणा केल्यानंतर या घोषणेबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. अनेक जण सरकारच्या या निर्णयावर टीका करत आहेत. सोबतच काही सरकारमधील नेत्यांकडून देखील या निर्णाला विरोध होताना दिसत आहे. काही जणांनी आम्हाला मोफत घर नको असं थेट सांगितलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply