Zika Virus : बंगळुरूमध्ये आढळला झिका व्हायरस! आरोग्य यंत्रणा हाय अलर्टवर; जाणून घ्या लक्षणे

Zika Virus :  कोरोना महामारीनंतर आता आणखी एका व्हायरसने आपल्या देशाची डोकेदुखी वाढवली आहे. या व्हायरसचे नाव आहे झिका व्हायरस. झिका व्हायरस हा डासांमार्फत पसरला जाणारा आजार आहे.

बंगळुरू शहराजवळील काही जिल्ह्यांमध्ये हा विषाणू आढळून आला आहे. कर्नाटकातील काही जिल्ह्यांतील डासांमध्ये हा प्राणघातक झिका विषाणू आढळला आहे. या संदर्भातील वृत्त ‘एबीपी न्यूजने’ दिले आहे. हा झिका विषाणू आढळल्यानंतर कर्नाटक राज्यात खळबळ माजली आहे. त्यामुळे, कर्नाटक राज्याचा आरोग्य विभाग सध्या हाय अलर्ट मोडवर आहे.

Rahul Gandhi : कॉंग्रेसला सत्ता दिल्यास महिलांना सक्षम करू; राहुल गांधींचे आश्‍वासन !

कर्नाटक राज्यातील सिडलघट्टा तालुक्यातील तालकायलाबेट्टा या गावांमधील डासांमध्ये हा झिका विषाणू आढळून आला. त्यानंतर, या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांची अंलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

व्यंकटपुरा, डिब्बुरहल्ली, बच्चनहल्ली, वड्डाहल्ली आणि इतर गावांना आरोग्य अधिकाऱ्यांनी वैयक्तिकरित्या भेट दिली असून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. चिक्कबल्लापुरा जिल्ह्यात हा झिका विषाणू आढळल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे, परिसरातील जवळपास 5000 लोकांवर आरोग्य यंत्रणा बारीक लक्ष ठेवून आहेत.

कर्नाटक राज्यातील विविध ६८ ठिकाणांचे नमुने घेण्यात आले असल्याची माहिती तिथल्या आरोग्य विभागाने दिली आहे. या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय सुरू करण्यात आले आहेत.

काय आहे झिका व्हायरस ?

युगांडातील झिका जंगलाच्या नावावरून या विषाणूचे नाव देण्यात आले आहे. याच ठिकाणी सर्वात आधी 1947 मध्ये हा विषाणू ओळखण्यात आला होता.

झिका हा डासांमार्फत पसरला जाणारा विषाणू आहे. दिवसभर सक्रिय असलेल्या संक्रमित एडिस प्रजातीच्या डासांनी चावा घेतल्यानंतर हा विषाणू प्रामुख्याने लोकांमध्ये पसरतो. एडिस डासांची पैदास ही पाण्यात होते. हा विषाणू असलेला डास चावल्यानंतर मानवामध्ये अनेक प्रकारची लक्षणे दिसू शकतात.

झिका व्हायरसची लक्षणे कोणती ?

  • ताप येणे

  • अंगदुखी

  • खाज सुटणे

  • डोकेदुखी

  • डोळे लाल होणे

  • सांधेदुखी

  • मांसपेशींमध्ये वेदना

  • स्नायूंमध्ये तीव्र वेदना होणे



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply