Yediyurappa : येडियुरप्पांनी जाहीर केली निवृत्ती; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आश्चर्यकारक निर्णय

बंगळुरु : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी संसदीय राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. टाइम्स नाऊनं याबाबत वृत्त दिलं आहे. 

आपल्या संसदीय राजकारणातील निवृत्तीच्या घोषणेनंतर येडियुरप्पा यांनी म्हटलं की, मी आता निवडणुका लढणार नसलो तरी अॅक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये कायम राहणार आहे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी भाजपसोबत काम करत राहिल.

येडियुरप्पा हे कर्नाटकातील लिंगायत समाजाचा चेहरा आहेत. भाजपचे ते मोठे नेते आहेत कारण ते असे एकमेव नेते आहेत ज्यांनी दक्षिण भारतात चार वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांनी कर्नाटकच्या विधानसभेत शुक्रवारी सदस्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी भावनिक भाषण केलं, ते म्हणाले, मी माझा प्रत्येक दिवस कर्नाटकच्या जनतेच्या सेवेसाठी घालवलं आहे. त्याचबरोबर त्यांनी विरोधीपक्ष नेते सिद्धरामय्या यांच्या योगदानाचं देखील कौतुक केलं.

जनसंघाचा कार्यकर्ता पासून भाजपच्या कार्यकर्त्यांपर्यंतचा प्रवासात जनतेसाठी काम केलं तसेच तळागळातील लोकांशी कायम जोडलेला राहिलो. मी कायमचं भाजपला उच्च पातळीवर नेण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी त्यांनी जुन्या जमान्यातील पक्षाचे नेते अटल बिहारी वाजपेयी आणि मुरल मनोहर जोशी यांच्या नावाचाही उल्लेख केला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply