Yavatmal News : पदयात्रेतील २०० भाविकांना भोजनातून विषबाधा; यवतमाळमधील खळबळजनक घटना

Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यातील माहूर येथून महानुभाव पंथीयांची पदयात्रा निघाली. ही पदयात्रा मार्गक्रमण करीत मोझर इथे जात होती. दरम्यान ही यात्रा चिकणी येथे पोहोचली. तेथे भाविकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली होती. भाविकांनी तेथे जेवण केलं. 

जेवन झाल्यानंतर भाविकांना मळमळ-उलटीचा त्रास जाणवू लागला. जेवण झाल्यानंतर काही वेळातच त्यांची प्रकृती बिघडायला सुरूवात झाली. अनेकांना मळमळ आणि उटलीचा त्रास सुरू झाला. तातडीने भाविकांना रूग्णालयात हलविण्यात आले.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या विशेष अधिवेशनापूर्वी CM शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक, कारण काय?

जेवनानंतर भाविकांना मळमळ आणि उलटीचा त्रास

पदयात्रेतील दोनशे भक्तांना भोजनातून विषबाधा झाल्याचं समोर आलं आहे. त्यापैकी 40 जण रूग्णालयात आहेत. अनेक रूग्णांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळतेय. 18 जण यवतमाळ येथे उपचार घेत आहेत.

नांदेडच्या माहूर येथून महानुभाव पंथीयांची पदयात्रा  निघाली होती. ही पदयात्रा मार्गक्रमण करीत यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील चिकणी कामठवाडा येथे पोहोचली. पद यात्रेतील भक्तांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. पदयात्रेतील भक्तांचे जेवण झाल्यानंतर काही वेळातच मळमळ आणि उलटीचा त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे काहींना लगतच्या गावातील खाजगी डॉक्टरांकडे नेण्यात आलं होतं.

दोनशे भाविकांना विषबाधा

मोठ्या प्रमाणात ही लक्षणे दिसू लागल्याने रुग्णांना दारव्हा उपजिल्हा रुग्णालय आणि यवतमाळ येथील शासकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं आहे. राजू घाटोळ यांच्या घरी चिकने येथे पदयात्रेसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. माहूर इथून मोझरमार्गे ही पदयात्रा जांभोरा येथे जाणार होती.

जेवण केल्यानंतर अनेकांना मळमळ उलटीचा त्रास होऊ लागला. 40 जणांना दारवा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये नाशिक इथून पद यात्रेत सहभागी झालेल्या भाविकांचा देखील समावेश आहेत. उर्वरित 18 जणांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काहींनी गावातच डॉक्टरांकडून उपचार घेतला आहे. जवळपास 200 जणांना जेवणानंतर ही लक्षणे आढळून आली आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply