Yavatmal News : ६५ हजाराचे कर्ज अन् ६ लाखांची वसुली, बँकेच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्याने संपवलं जीवन

Yavatmal News : यवतमाळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यवतमाळच्या सुधाकर नगर येथील 68 वर्षीय शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून जीवन संपवलं आहे. या शेतकऱ्याने बॅंकेच्या कर्जाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल उचललं आहे. या घटनेबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊ या. 

या शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. या शेतकऱ्याचं वय 68 वर्ष होतं. दत्ता जाधव ( राहणार सुधारक नगर) असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. बॅंकेच्या कर्जाला कंटाळून या व्यक्तीने आत्महत्या केल्याचं सुसाई़ड नोटमधून समोर आलं आहे.

Accident News : पुणे-नाशिक महामार्गावर तीन वाहने एकमेकांवर आदळली; विचित्र अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

कर्जामुळे मानसिक तणाव

दत्ता जाधव यांनी बॅंक ऑफ महाराष्ट्रकडून कर्ज घेतलं होतं. जास्तीचं कर्ज काढल्याने शेतकऱ्याच्या मनावर विपरीत परिणाम झाला. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली आहे. घटनास्थळी पोलिसांना सुसाई़ड नोट सापडली. ही नोट पाच पानांची होती. या पाचपानी चिठ्ठीत या शेतकऱ्याने जवळच्या लोकांना आपल्या मुलांकडे लक्ष देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

शेतकरी दत्ता जाधव यांच्याकडे सात ते आठ एकर शेती होती. आर्थिक अडचणींमुळे त्यांनी बॅंक ऑफ महाराष्ट्रकडून कर्ज घेतलं होतं. कर्जाचे वेळेवर हप्ते भरले जात नव्हते, परतफेड होत नव्हती. दिवसेंदिवस या कर्जाची रक्कम फुगत चालली होती. त्यामुळे दत्ता जाधव यांना मोठ्या प्रमाणात मानसिक तणाव होता.

बॅंकेच्या त्रासाला कंटाळून टोकाचा निर्णय

कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांनी जमीन विकण्याचा निर्णय घेतला होत. शेवटी त्यांनी पाच एकर शेती विकून कर्जाची परतफेड केली. 65 हजार कर्ज असताना बॅंकऑफ महाराष्ट्राला त्यांना सहा लाख रूपये द्यावे लागले. त्यामुळे त्यांच्या मनावर विपरीत परिणाम झाला. शेवटी त्यांनी चिठ्ठी लिहून विषारी औषध प्राशन करून जीवन संपवलं.

दरम्यान आत्महत्या करण्यापूर्वी शेतकरी दत्ता जाधव यांनी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तवंर यांना माझ्या कुटुबाची काळजी घ्या. बँकेत जाऊन माझ्यावरील कर्जाची चौकाशी कराल, असं देखील त्याच चिठ्ठीत लिहीलें आहेत. विशेष म्हणजे बँकेच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करीत असल्याचं त्यांनी चिठ्ठीत नमूद केलं  आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply