Yavatmal News : यवतमाळमध्ये महाविकास आघाडी समर्थकांकडून जल्लोष करत घोषणाबाजी; संजय देशमुख यांना आघाडी

Yavatmal News : महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख हे विजयाच्या वाटेवर असताना यवतमाळमध्ये महाविकास आघाडी व शिवसेना ठाकरे गटाच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष करण्यास सुरवात केली आहे. तर महाविकास आघाडी जिंदाबाद असे नारे यावेळी कार्यकर्त्यांनी दिले.
 
लोकसभा निवडणुकीची आज होत असलेल्या मतमोजणीनंतर निकालाचे चित्र स्पष्ट होत आहे. यवतमाळमधून महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. यापूर्वीच कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष साजरा करण्यास सुरवात केली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांनी आतापर्यंत ५३ हजार ११६ मतांची लीड घेतली आहे. 
 
यवतमाळ येथील शासकीय धान्य गोडाऊन परिसरात मतमोजणी करण्यात येत असून मतमोजणी केंद्राबाहेर महाविकास आघाडी यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जमले असून ते घोषणाबाजी करताना कार्यकर्ते दिसून येत आहे. १६ व्या फेरी अंती ५३ हजार ११६ मतांची आघाडी देशमुख यांनी घेतली आहे. ही आघाडी पाहता कार्यकर्त्यांमध्ये यवतमाळमध्ये उत्साह दिसून येत आहे.
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply