Yavatmal Flood : यवतमाळमध्ये महापुरात अडकले ८० जण; हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन सुरू...

Yavatmal Rain : यवतमाळमध्ये पैनगंगा नदीने रौद्ररूप धारण केले आहे. त्यामुळे आलेल्या पुराच्या पाण्यात 80 जण अडकल्याची माहिती मिळत आहे. सकाळपासून अडकलेल्या या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आता हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली आहे.

आनंद नगर येथील हे नागरिक आहेत. हेलिकॉप्टपच्या साह्याने त्यांना बाहेर काढण्यासाटी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार,यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे. अशातच शुक्रवारी रात्री मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्प ओव्हरफ्लो झाले. पैनगंगेला महापुर आल्याने महागाव तालुक्यातील अनंतवाडी गावाला पुराचा वेढा बसला आणि यामध्ये 80 लोक अडकून पडले. 

पश्चिम बंगालमध्ये भर बाजारात दोन महिलांना विवस्त्र करुन मारहाण; घटनेने देशभरात संताप

याबाबत माहिती देताना वायुसेनेचे विंग कमांडर रत्नाकर सिंह म्हणाले की, यवतमाळ जिल्ह्यातल्या महागाव येथील स्थानिक प्रशासनाने विनंती केल्यानुसार MI 17 V 5 हे हेलिकॉप्टर तात्काळ महागाच्या दिशेनं उडलं आहे. 70 ते 80 लोक महागाव परिसरात अडकले असल्याची माहिती आहे. त्या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून अडकलेल्यांची सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply