Yavatmal DCC Bank Chairman Election : यवतमाळ जिल्हा बॅंकेचा अध्यक्ष महायुतीचा की महाविकासचा? 5 जणांच्या नावांची रंगलीय चर्चा

Yavatmal : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नव्या जिल्हाध्यक्षांची निवडीचा मुहूर्त निश्चित झाला आहे. येत्या 18 सप्टेंबरला या निवडीसाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. 

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष टिकाराम कांगोरे यांनी राजीनामा दिला. कांगाेरे यांच्या राजीनाम्यानंतर बॅंकेच्या राजकारणाची समीकरणे पूर्णत: बदलली आहेत. या बॅंकेच्या अध्यक्षपदासाठी पाच जणांची नावांची चर्चा सुरु झाली आहे.

Buldhana Crime News : मध्यरात्री घरात घुसले, पती-पत्नीचे हातपाय बांधले अन्... बुलढाण्यात ४ ठिकाणी सिनेस्टाईल दरोडा

नव्या अध्यक्षांसाठी सध्या महायुतीकडून चार जणांची नावे पुढे आली आहेत. महाविकास आघाडीकडून एक नाव चर्चेत आहेत. यामध्ये महायुतीकडून वसंत घुईखेडकर, अमन गावंडे, स्नेहल भाकरे, मनीष पाटील यांची नावे चर्चेत आहे.

यवतमाळकरांत उत्सुकता

महाविकास आघाडीतून देखील राजुदास जाधव यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आले आहे. त्यामुळे नेमकं अध्यक्षपदाची माळ काेणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता यवतमाळकरांना लागली आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *