Car Accident : प्रयागराजवरून परतताना काळाचा घाला; कारची टँकरला धडक, महिलेचा मृत्यू, मुलगा गंभीर

Yavatmal : उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळा भरलेला आहे. याठिकाणी शाहीस्नान करण्यासाठी भाविक जात आहेत. त्यानुसार धाराशिव येथील परिवार प्रयागराजला गेले होता. तेथून परत येत असताना यवतमाळच्या आर्णी तालुक्यात या परिवाराच्या कारला अपघात झाला. यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

नागपूर- तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग वरील यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील सुकळी जवळ हा अपघात झाला. यात चिखली धाडेश्वर (जि. धाराशिव) येथील विमल बालचंद्र महामुने (वय ६७) यांचा जागीच मृत्यू झाला. तर राहुल बालचंद्र महामुने (वय ३५) असे गंभीर जखमी झालेल्या मुलाचे नाव असून इतर दोन महिला व एक पुरुष किरकोळ जखमी झाले आहेत.

प्रयागराज येथे भरलेल्या महाकुंभमेळ्यासाठी जाणाऱ्यांची ओघ सुरु आहे. अंतिम टप्प्यात आलेल्या महाकुंभमेळ्यातील शेवटचे शाहीस्नान पुढील आठवड्यात होणार आहे. यामुळे भाविक आता मोठ्या संख्येने प्रयागराजला जात आहेत. त्यानुसार धाराशिव जिल्ह्यातील महामुने परिवार प्रयागराजला गेला होता. त्याठिकाणाहून परतताना त्यांच्या कारने समोर जाणाऱ्या टँकरला मागून जबर धडक दिल्याने हा अपघात झाला.

मृतक महिला ही आपल्या परिवारा सोबत धाराशिव येथून प्रयागराजला महाकुंभमेळ्यात गेली होती. कुंभमेळ्यातून परत आर्णी मार्गे धाराशिव (उस्मानाबाद) कडे जात असताना आर्णी तालुक्यातील सुकळी जवळ यवतमाळ वरून माहूरच्या दिशेने जाणाऱ्या टँकरला कारने जबर धडक दिली. यात कारमधील ६७ वर्षीय महिला ही जागीच ठार झाली. तर त्याचा ३५ वर्षीय मुलगा हा गंभीर जखमी झाला आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply