Women U19 WC : भारताच्या लेकी बनल्या करोडपती! वर्ल्डकप जिंकताच! BCCI सचिव जय शहांची मोठी घोषणा

Women U19 WC : शेफाली वर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय अंडर-19 महिला क्रिकेट संघाने अंतिम फेरीत इंग्लंडचा धुव्वा उडवला. प्रथम गोलंदाजी आणि नंतर फलंदाजीत चमकदार कामगिरी करत इंग्लंडला पराभवाची धूळ चारली. यासह भारताने अंडर-19 महिला विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. यानंतर जय शहा यांनी बक्षीस बाबत मोठी घोषणा केली.

भारतासमोर विजयासाठी 69 धावांचे छोटे लक्ष्य होते, जे संघाने 14व्या षटकात पूर्ण केले. शफाली वर्माने अप्रतिम शॉट मारले, पण ती 15 धावा करून बाद झाली. यानंतर भारताला आणखी एक धक्का बसला सेमीफायनलची स्टार श्वेता सेहरावतने 5 धावा केल्या. सौम्या तिवारी आणि गोंगडी यांनी डाव सावरला आणि चांगली भागीदारी करत 46 धावांची भर घातली आणि गोंगडी बाद झाला तेव्हा भारत विजयाच्या उंबरठ्यावर होता. भारताने हा सामना 7 गडी राखून जिंकून विजेतेपद पटकावले.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी विजेतेपद पटकावल्याबद्दल भारतीय महिला क्रिकेट संघाचे अभिनंदन केले. अभिनंदना सोबतच त्याने लिहिले - मला हे कळवायला आनंद होत आहे की BCCI विजयी संघ आणि सपोर्ट स्टाफसाठी 5 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर करत आहे.

तत्पूर्वी, भारतीय महिला गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत सुरुवातीपासूनच विकेट्स घेतल्या आणि एकाही इंग्लिश फलंदाजाला क्रीजवर स्थिरावू दिले नाही. अर्चना देवीसह तितासू साधू आणि पार्श्वी चोप्राने 2-2 विकेट घेतल्या. मन्नत कश्याम, कर्णधार शेफाली वर्मा आणि सोनम मुकेश यादव यांनी 1-1 विकेट घेतली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडचा डाव 17.1 षटकांत 68 धावांत आटोपला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply