Women Maharashtra Kesari : महिलांची पहिली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात...

Women Maharashtra Kesari : महिलांची पहिली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आता 1 वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने सांगली येथे २३ व २४ मार्चला स्पर्धा होत असताना, भारतीय महासंघाच्या अस्थायी समितीने १ ते ७ एप्रिल दरम्यान पुण्यात स्पर्धा जाहीर केली. आता कोल्हापुरात ही स्पर्धा घेण्याची घोषणा दीपाली सय्यद यांनी केली आहे. परिणामी कुस्ती क्षेत्राच्या भुवया उंचावल्या आहेत.

राज्य कुस्तीगीर परिषद व अस्थायी समितीतील मतभेदाला अद्याप पूर्णविराम मिळालेला नाही. पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्यास दोन्ही गट उत्सुक आहेत. सांगलीत स्पर्धेची तयारी सुरू असताना, कोल्हापुरात स्पर्धा घेण्याच्या हालचाली आहेत. विशेष म्हणजे कोल्हापूर शहर व जिल्हा राष्ट्रीय तालीम संघातर्फे सांगलीतील स्पर्धेसाठी नुकतीच नंदगावला निवड चाचणी झाली.

राज्य कुस्तीगीर परिषदेने सांगली येथील महिलांच्या पहिल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेस मान्यता दिली आहे. तीच स्पर्धा अधिकृत आहे. सांगलीत स्पर्धेची जय्यत तयारी करण्यात येत आहे. अस्थायी समितीला महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याचा अधिकार नाही.

बाळासाहेब लांडगे, सरचिटणीस, राज्य कुस्तीगीर परिषद

राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेव मोहिते स्पर्धा तीन दिवसांवर येऊन ठेपल्याने स्पर्धेच्या आयोजनात व्यस्त आहेत. त्यामुळे सांगलीतील स्पर्धा रद्द करून ती कोल्हापुरात आणणे आता शक्य नाही. सय्यद यांनी महिलांच्या महाराष्ट्र केसरीसाठी पाठपुरावा केला असला तरी त्यांच्याकडे परिषदेचे कोणते पद आहे, याची विचारणा होऊ लागली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply