Weather Updates: पुण्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; राज्यभरात धो-धो कोसळणार, या जिल्ह्यांना अलर्ट

पुणे  : काही दिवसांची उघडीप मिळाल्यानंतर पावसाने पुन्हा एकदा राज्यात थैमान घालायला सुरूवात केली आहे. पुढचे 4 ते 5 दिवस राज्यात मान्सून सक्रिय राहणार असून काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसांची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. मुसळधार पावसाने जलमय झालेल्या पुण्यात आणखी दोन दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच्या लगतच्या भागात पुढील 3-4 तास मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी पडू शकतात, असा अंदाज सकाळी साडेनऊ वाजताच्या सॅटेलाईट निरीक्षणावरुन वर्तवण्यात आला आहे

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भासह मराठवाड्यावर पुन्हा एकदा पावसाचे ढग जमा झाले आहेत. या प्रदेशांसोबतच लगतच्या परिसरामध्येही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तर कोकणातही पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

आज म्हणजेच 12 सप्टेंबरला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना, तर 13 सप्टेंबरला रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 14 सप्टेंबर रोजी पुणे आणि मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, या तिन्ही दिवशी मुंबईत येलो अलर्ट देण्यात आला आहे. 12 सप्टेंबरपासून मुंबई, ठाण्यासह कोकण भागात पावसाची तीव्रता वाढण्याची दाट शक्यता आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply